कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा खूपच भयानक आहे ज्यात मनोरंजनसृष्टीतीलसुद्धा अनेकांना लपेट्यात घेतले. अनेक आघाडीच्या कलाकारांना कोरोनाची लागण झाली ज्यात अभिनेत्री भूमी पेडणेकरचाही नंबर येतो. बॉलिवूडकर लोकांना सुरक्षित राहण्यासाठी पदोपदी आवाहन करतच आहेत परंतु ज्यांना कोरोना होऊन गेलाय ते कलाकार तळमळीने सांगताहेत की कोरोनाविरुद्ध लढण्याची त्रिसूत्री, हात वारंवार धुणे, मास्क चा यथोचित वापर करणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे, न चुकता पाळा. भूमी तर त्याहीपुढे जाऊन कोरोनाग्रस्तांना मदत करताना दिसतेय. या साथीच्या आजारात जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घेऊन ती काम करतेय.
कोरोनमुक्त झाल्यावर भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर ‘कोविड वॉरियर’ अभियान सुरु केले असून कोरोना पीडितांची मदत करण्यास ते उपयोगी पडत आहे. आता तर भूमी ने एक पाऊल पुढे जात आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि त्यांचे आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन यांच्यासमवेत जुळत कोविडने ग्रासलेल्यांची मदत करण्याचा विडा उचलला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनने ‘कोविड रिलीफ’ बरोबर ‘मिशन जिंदगी’ या भारत-स्वयंसेवी सेवा उपक्रमाची सुरूवात केली आहे. रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन पुरवठा, भोजनाचे डबे, डॉक्टरांचा सल्ला आणि मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन इत्यादी आवश्यक माहिती देत त्यांचे स्वयंसेवक कोविड-१९ ने पीडित लोक आणि कुटुंबांची सेवा युद्धपातळीवर करीत आहेत.
आता हे सर्व विविध उपक्रम व्यापक आणि सहजतेने देशभरात पोहोचण्यासाठी काम केले जातेय. ७ निकषांवर या मोहिमेअंतर्गत कोविड सवलती कव्हर केल्या जातील....
१. रुग्णालय: ऑक्सिजन असलेल्या आणि नसलेल्या बेडच्या उपलब्धतेशी संबंधित रुग्णालयाची अद्यतने.
२. ऑक्सिजन सिलेंडर्स व काँसंट्रेटर्स यांच्या देणगींची तरतूद व त्यांची उपलब्धता याबाबतची माहिती.
३. आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका सेवेसोबत अनुषंग.
४. डॉक्टर: कोरोनाची सौम्य लक्षणे असतील त्यांच्यासाठी डॉक्टरांशी कन्सल्टेशन आणि विलगीकरणासाठी मदत आणि माहिती.
५. स्थानिक खाद्य पुरवठादार व पुरवठादारांशी संपर्क.
६. आयुर्वेदिक औषधांच्या स्त्रोतांशी संपर्क साधणे.
७. मानसिक आरोग्य: सर्व वयोगटातील समुपदेशनासह ध्यान आणि योग कार्यशाळा.
श्री श्री रविशंकर म्हणतात की, “या वेळी आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या लोकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य आणि चैतन्य पुनःसंचयित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणूनच #MissionZindagi ची स्थापना केलीय. ज्यांना खरोखरी मदतीची गरज आहे त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात देईल.”
हेही वाचा - काँग्रेस आमदारावर वांशिक टिपण्णी करणाऱ्या यु ट्यूबरवर वरुण धवनसह सेलेब्रिटींची टीका