ETV Bharat / sitara

भिडे इन बँकॉक..! सुश्रुत भागवत यांच्या सिनेमाच पहिलं पोस्टर लाँच

author img

By

Published : Feb 24, 2020, 3:54 PM IST

सुश्रुत भागवत आता नव्या चित्रपटाच्या तयारीला लागले असून "भिडे इन बँकॉक" असे या चित्रपटाचे नाव आहे. उदाहरणार्थ निर्मित, विकास हांडे आणि लोकेश मांगडे हे "भिडे इन बँकॉक" ह्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

Bhide in Bangkok
भिडे इन बँकॉक

"पेईंग घोस्ट", "मुंबई टाईम", "असेही एकदा व्हावे" असे उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित केलेले सुश्रुत भागवत आता नव्या चित्रपटाच्या तयारीला लागले असून "भिडे इन बँकॉक" असे या चित्रपटाचे नाव आहे. उदाहरणार्थ निर्मित, विकास हांडे आणि लोकेश मांगडे हे "भिडे इन बँकॉक" या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

उदाहरणार्थ निर्मित यांची निर्मिती केलेल्या "कागर" या चित्रपटला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. "भिडे इन बँकॉक" या चित्रपटाची कथा-पटकथा शर्वाणी-सुश्रुत यांची असून चित्रपटाचे दिग्दर्शन सुश्रुत भागवत यांचे आहे. मध्यमवर्गीय, पापभिरू भूषण भिडे या पात्राभोवती चित्रपटाची कथा केंद्रित असणार आहे.

Bhide in Bangkok
भिडे इन बँकॉक

सुश्रुत भागवत यांनी आतापर्यंत केलेले तीन चित्रपट एकमेकांपेक्षा वेगळे होते. हे वेगळेपण कायम जपत "भिडे इन बँकॉक" या चित्रपटातूनही सुश्रुत मजेशीरपणे कथा मांडणार आहे. चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून चित्रपटात कलाकार कोण असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. यावर्षाच्या अखेरीस हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.