मुंबई - काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या ज्योतिष महिला बलात्कार प्रकरणी टीव्ही अभिनेता करण ऑबेरॉयला अटक करण्यात आली होती. त्याचा जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ६ मे ला करणला अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात करणला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी ठोठवण्यात आली होती. त्यानंतर करण ओबेरॉयने दिंडोशी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
तक्रार करणारी महिला आणि करण ओबेरॉय हे दोघेही २०१६ पासून रिलेशनशीपमध्ये होते. लग्नाचे आश्वासन देत बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, करणने बलात्कार केल्याचा व्हिडिओ बनवून तिला धमकवत होता.
करण ओबेरॉय याने 'जस्सी जैसी कोई नही,' 'स्वाभिमान', 'साया', 'जिंदगी बदल सकता है हादसा' या मालिकांमध्ये काम केले आहे. यापैकी 'जस्सी जैसी कोई नही' मालिकेच्या मोना सिंग या अभिनेत्रीसोबतही त्याचे रिलेशनशीप होते. मात्र, नंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते.