ETV Bharat / sitara

Badla Review : सत्याचा शोध घेण्यासाठी रचलेल्या अनोख्या सूडचक्राचा वेध - thriler

बंद खोलीत २ व्यक्ती त्यातील एका व्यक्तीचा खून होतो आणि त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीवर या खुनाचा आरोप होतो. आता या खुनात अडकलेली व्यक्ती हा आरोप नाकारते आणि तिथूनच सिनेमाची खरी गोष्ट सुरू होते.

बदला
author img

By

Published : Mar 9, 2019, 8:09 AM IST

मुंबई - 'बदला' म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत पाहिलेलं काहीतरी नक्की डोळ्यासमोर येत असेल. मात्र, या सिनेमात घेतलेला बदला काहीसा वेगळा आहे. एक अंतिम सत्य आणि ते उलगडण्यासाठी एका पाठोपाठ एक असत्याचा केलेला पाठलाग या सिनेमात अतिशय सुंदररित्या मांडण्यात आला आहे.

सिनेमाची कथा -

कोणत्याही सस्पेन्स थ्रिलर सिनेमाला एक प्लॉट लागतो तो याही सिनेमात आहे. बंद खोलीत २ व्यक्ती त्यातील एका व्यक्तीचा खून होतो आणि त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीवर या खुनाचा आरोप होतो. आता या खुनात अडकलेली व्यक्ती हा आरोप नाकारते आणि तिथूनच सिनेमाची खरी गोष्ट सुरू होते. यात खुनाचा आरोप असलेली व्यक्ती आहे नैना सूरी म्हणजेच तापासी पन्नू. तर तिला या आरोपातून सोडवण्यासाठी तिला भेटायला येतात ते वकील बादल गुप्ता म्हणजेच अमिताभ बच्चन. या नमनाला घडाभर तेल न घालता त्यांच्या भेटीने सिनेमाला सुरुवात होते आणि पुढे एक एक गोष्टी उलगडत जातात.

'दि इनविझिबल गेस्ट'चा हिंदी रिमेक -

आता सगळ्यात आधी हे सांगायला हवं, की हा सिनेमा काही ओरिजिनल हिंदी सिनेमा नाही. तर २०१७ साली आलेल्या 'दि इनविझिबल गेस्ट' या स्पॅनिश सिनेमाचा हिंदीतील रिमेक आहे. कहानी, कहानी २ यांसारखे थ्रिलर सिनेमे देणाऱ्या दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

कलाकारांच्या भूमिका -

सिनेमात अमिताभ आणि तापसी यांच्या भूमिका जबरदस्त झाल्या आहेत. बिग बींना वकिलाचा रोल असला तरी त्यांना फक्त बोलण्याचे श्रम पडलेत. बाकी ते करत असलेली इतर सिनेमांमधील धावपळ या सिनेमात त्यांच्या वाट्याला आलेली नाही. तापसीसोबत त्यांनी याआधीही 'पिंक'मध्ये वकिलाची भूमिका साकारली होती. तरीही या सिनेमात त्यांनी पुन्हा वकील बनायला होकार देण्यामागे सिनेमाची कथा हेच कारण पुरेसं होतं, असे सिनेमा पाहिल्यावर नक्की जाणवतं. या दोघांशिवाय अभिनेत्री अमृता सिंग ही देखील फारच दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. साराचा डेब्यू झाला असला तरीही अमृता यांच्या अभिनयातील चार्म कायम असल्याची साक्ष 'बदला' देतो. याशिवाय मानव कौल, नवोदित टोनी ल्यूक, आणि तन्वीर घनी यांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.

निराश न करणारा 'बदला' -

सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहताना कथानक पुढे पुढे जात असताना प्रेक्षक देखील त्या कथानकाचा भाग बनून कथेतील गुंता सोडवायला लागतो. असंच काही हा सिनेमा पाहतानाही घडतं. पण 'बदला' हा नक्की कोण? कुणाचा? आणि कसा घेतो? यापेक्षा जास्त असत्यावरचे पदर दूर करत सत्यापर्यंत पोहोचण्याची मांडणी नक्की कशी करण्यात आली आहे त्यासाठी हा चित्रपट जास्त लक्षात राहतो. तुम्हीही बॉलिवूडमध्ये बनणाऱ्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे फॅन असाल तर बदला तुम्हाला अजिबात निराश करणार नाही.

Intro:'बदला' म्हटलं कि आपल्याला सगळ्यात आधी डोक्यात जे काही बॉलिवूडच्या डझनभर सिनेमात पाहिलेलं काहीतरी नक्की डोळ्यासमोर येत असेल. मात्र या सिनेमात घेतलेला बदला काहीसा वेगळा आहे. एक अंतिम सत्य आणि ते उलगडण्यासाठी एका पाठोपाठ एक असत्याचा कसा पाठलाग केला जातो ते या सिनेमात अतिशय सुंदररित्या दाखवण्यात आलं आहे.

कोणत्याही सस्पेन्स थ्रिलर सिनेमाला एक प्लॉट लागतो तो याही सिनेमात आहे. बंद खोलीत दोन व्यक्ती त्यातील एका व्यक्तीचा खून होतो आणि त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीवर या खुनाचा आळ येतो. आता या खुनात अडकलेली व्यक्ती हा आरोप नाकारते आणि तिथूनच सिनेमाची खरी गोष्ट सुरू होते. यात खुनाचा आरोप असलेली व्यक्ती आहे नैना सूरी म्हणजेच तापासी पंनू तर तिला या आरोपातून सोडवण्यासाठी तिला भेटायला येतात ते वकील बादल गुप्ता म्हणजेच अमिताभ बच्चन. या नमनाला घडाभर तेल न घालता त्यांच्या भेटीने सिनेमाला सुरुवात होते. आणि पुढे एक एक गोष्टी उलगडत जातात.

आता सगळ्यात आधी हे सांगायला हवं की हा सिनेमा काही ओरिजिनल हिंदी सिनेमा नाही तर 2017 साली आलेल्या 'दि इनविझिबल गेस्ट' या स्पॅनिश सिनेमाची हिंदीतील रिमेक आहे. कहानी, कहानी 2, तीन, यासारखे थ्रिलर सिनेमे देणाऱ्या दिग्दर्शक सुजॉय घोष याने या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. आता हिंदीत ते बसवताना त्याने सिनेमाची कथाही भारताऐवजी युरोपात सेट केली आहे. सध्या बॉलिवूडचे बहुतेक सिनेमे परदेशात शूट होत असल्याने कथा तिथे घडल्याने फारसं काही बिघडत नाही. पण त्यामुळे कथा मांडताना मात्र सुटसुटीतपणा आला आहे एवढं नक्की.

सिनेमात अमिताभ आणि तापसी यांच्या भूमिका तर जबरदस्त झाल्यात. बिग बीना वकिलाचा रोल असला तरी त्यांना फक्त बोलण्याचे श्रम पडलेत. बाकी ते करत असलेल्या इतर सिनेमामध्ये असलेली धावपळ या सिनेमात त्यांचा वाट्याला आलेली नाही. तापसीसोबत त्यानी 'पिंक'मध्ये वकील साकारला होता तरीही या सिनेमात त्यांनी पुन्हा वकील बनायला होकार देण्यामागे सिनेमाची कथा हेच कारण पुरेसं होत असे सिनेमा पाहिल्यावर नक्की जाणवतं. या दोघाशिवाय अभिनेत्री अमृता सिंग ही देखील फारच दमदार भूमिकेतुन आपल्या भेटीला अली आहे. साराचा डेब्यू झाला असला तरीही अमृता यांच्या अभिनयातील चार्म कायम असल्याची साक्ष 'बदला' देतो. याशिवाय मानव कौल, नवोदित टोनी ल्यूक, आणि तन्वीर घनी यांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.

सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहताना कथानक पुढे पुढे जात असताना प्रेक्षक देखील त्या कथानकाचा भाग बनून कथेतील गुंता सोडवायला लागतो. त्यातील काही तर्क आता असे सिनेमे बघून बघून तो करायला शिकलेला असतो, मात्र तरीही पुढे काय होईल याची धाकधुक त्याच्या मनाला लागलेली असते. असच काही हा सिनेमा पाहतानाही घडतं. पण 'बदला' हा नक्की कोण? कुणाचा? आणि कसा घेतो? यापेक्षा जास्त असत्यावरचे पदर दूर करत सत्यापर्यंत पोहोचण्याची मांडणी नक्की कशी करण्यात आली आहे त्यासाठी जास्त लक्षात राहतो. तुम्हीही बॉलिवूड मध्ये बनणाऱ्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे फॅन असाल तर बदला तुम्हाला अजिबात निराश करणार नाही.

( सिनेमाचा रिव्ह्यू - तीन स्टार )

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.