मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी तसेच लेखिका आणि फिल्ममेकर ताहिरा कश्यपला काही महिन्यांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. तिच्यावर केमोथेरपीदेखील करण्यात आली आहे. ताहिरासोबतच तिचं कुटुंब आणि आयुष्मानच्या आयुष्यातला हा सर्वात कठीण काळ होता. मात्र, कठीण प्रसंगात तुमच्या कुटुंबाची आणि पतीची जर साथ मिळाली तर हा कठीण प्रसंगही सोपा होतो, असे ताहिरा म्हणाली आहे.
अलिकडेच ताहिराने बजाज इलेक्ट्रीकल्स पिंकथॉन मुंबई, येथे हजेरी लावरी होती. त्यावेळी तिने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ती मिलिंद सोमन यांच्यासोबत उपस्थित होती.
आयुष्मानबाबत बोलताना ती म्हणाली, की 'माझ्या कठीण काळात आयुष्मानने मला नेहमीच आधार दिला. त्याने माझ्यासाठी करवा चौथचे व्रतही घेतले होते'.
हेही वाचा -गंभीर दुखापत होऊनही शूटिंगसाठी परतली परिनीती, 'अशी' घेतेय मेहनत
'तुम्ही तुमचे दु:ख आणि स्ट्रगल कोणाशीही शेअर करू शकत नाही. मात्र, जर, तुम्हाला तुमच्या आईवडिलांची, पतीची, मुलांची सोबत मिळाली, तर आपल्यााल कठीण वाटणार काळही कठीण वाटत नाही. हा प्रवास सोपा होतो. आपल्याला कोणाचा तरी आधार हवा असतो. त्यामुळेच सर्वांच्याच आयुष्यात असं प्रेम, आधार असावा, अशी इच्छाही ताहिराने व्यक्त केली.
मागच्या वर्षी ताहिराने तिच्या कॅन्सरविषयी माहिती दिली होती. तरीही तिने हिमतीने कॅन्सरशी लढा दिला. तसेच, इतरांसाठीही तिने प्रेरणादायी पोस्ट शेअर केल्या. तसेच, ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृतीदेखील केली.
हेही वाचा -....तर 'कुली नंबर १'चा स्टंट वरूणच्या जीवावर बेतला असता...