ETV Bharat / sitara

'शुभ मंगल ज्यादा सावधान'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली, दोन नवे पोस्टर रिलीज - Ayushmaan Khurrana in Shubh Mangal jyada saavdhann

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटातील दोन नवे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. तसेच चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच पाहायला मिळणार आहे.

Shubh Mangal jyada saavdhann new release date, Shubh Mangal jyada saavdhann new poster, #AyushmannKhurrana, #ShubhMangalZyadaSaavdhan, Shubh Mangal jyada saavdhann trailer news, 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट, आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडणेकर, Ayushmaan Khurrana in Shubh Mangal jyada saavdhann,  Shubh Mangal jyada saavdhann film latest news
'शुभ मंगल ज्यादा सावधान'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली, दोन नवे पोस्टर रिलीज
author img

By

Published : Jan 20, 2020, 12:57 PM IST

मुंबई - आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'शुभ मंगल सावधान' चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असं या चित्रपटाचं शीर्षक असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटातील दोन नवे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. तसेच चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच पाहायला मिळणार आहे.

'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा वेगळा आहे. यामध्ये आयुष्मान खुराना हा समलैंगिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्येही 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटातील आयकॉनिक सिनप्रमाणेच लुक पाहायला मिळतो.

हेही वाचा -'झुंड' चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये महानायकाची दमदार झलक, पाहा फोटो

'जितेगा प्यार से परिवार' अशी टॅगलाईन या पोस्टरवर दिलेली आहे. तसेच, नीना गुप्ता आणि गजराज राव यांचाही लुक यावर दिसून येतो. आयुष्मानच्या इतर चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाची कथादेखील धमाल मनोरंजन करणारी असेल, असा अंदाज या पोस्टवरून येतो.

या चित्रपटात भूमी पेडणेकरचीही मुख्य भूमिका पाहायल मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्या यांनी केले आहे. तर, भूषण कुमार, आनंद एल. राय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २१ फेब्रुवारी २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -'शहिद भाई कोतवाल' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, २४ जानेवारीला होणार प्रदर्शित

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.