ETV Bharat / sitara

सलमान खान पुन्हा होणार 'मामा', आयुष-अर्पिताने दिली 'गुडन्यूज' - आयुष शर्मा

२०१४ साली दोघांनी लग्नगाठ बांधली होती. २०१६ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं होतं. अहिल असं त्याचं नाव आहे. आता दोघेही दुसऱ्यांदा आई - वडील बनणार आहेत.

सलमान खान पुन्हा बनणार 'मामा', आयुष-अर्पिताने दिली 'गुडन्यूज'
author img

By

Published : Sep 20, 2019, 1:37 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मा आणि त्याची पत्नी अर्पिता खान दोघेही पुन्हा एकदा आई - बाबा होणार आहेत. 'आयफा अवार्ड्स २०१९' या सोहळ्यात त्यांनी ही आनंदाची बातमी सर्वांना दिली. यानिमित्ताने सलमान खान पुन्हा एकदा मामा बनणार आहे.

आयुष आणि अर्पिताला पहिला ३ वर्षांचा मुलगा आहे. दुसऱ्यांदा आईवडील होणार असल्याने दोघेही फार आनंदी आणि उत्साही आहेत. पुन्हा एकदा बाळाच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, असे आयुषने यावेळी सांगितले.

आयुष-अर्पिताने दिली 'गुडन्यूज'

२०१४ साली दोघांनी लग्नगाठ बांधली होती. २०१६ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं होतं. अहिल असं त्याचं नाव आहे. आता दोघेही दुसऱ्यांदा आई - वडील बनणार आहेत.

हेही वाचा -IIFA Awards 2019: ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड कलाकारांचा जलवा

आयुष शर्माने २०१८ साली 'लव्हयात्री' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्याच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता लवकरच तो पुन्हा एकदा कॅटरिना कैफची बहीण ईझाबेल कैफ यांच्यासोबत झळकणार आहे.

हेही वाचा -हृतिक विरुद्ध टायगर: 'वॉर'च्या प्रमोशनसाठी वापरला हटके फंडा

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.