ETV Bharat / sitara

पद्मिनी कोल्हापुरे आणि अशोक सराफ यांचा ‘प्रवास’ झाला पुरस्कृत! - Padmini Kolhapure latest news

अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत विविध पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या ‘प्रवास’ या मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जोधपूरच्या प्रसिद्ध मेहरानगड किल्ल्यात संपन्न झालेल्या रंगतदार सोहळ्यात ‘प्रवास’ला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा ‘विशेष ज्युरी पुरस्कार’ व शशांक उदापूरकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. आयुष्याच्या प्रवासाचा एक आगळावेगळा दृष्टिकोन दाखविणाऱ्या ‘प्रवास’ चित्रपटामध्ये अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापुरे, विक्रम गोखले, श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Pravas  was rewarded
‘प्रवास’ झाला पुरस्कृत
author img

By

Published : Mar 27, 2021, 12:19 PM IST

मुंबई - पद्मिनी कोल्हापुरे आणि अशोक सराफ अभिनित ‘प्रवास’ या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक यांनी भरपूर पाठिंबा दिला होता. या चित्रपट पुरस्कार मिळाले नसते तर नवल वाटले असते. मानाच्या समजल्या जाणाऱ्या अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत विविध पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या ‘प्रवास’ या मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सातव्या राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये समाविष्ट झालेल्या विविध राज्यांतील अनेक चित्रपटांमधून ‘प्रवास’ला हा पुरस्कार मिळाला आहे. ‘प्रवास’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा व सर्वोत्तम दिग्दर्शकीय पुरस्काराचा बहुमान प्राप्त झाला आहे. ‘प्रवास’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगने महोत्सवाची सांगता झाली तेव्हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट हा क्षण सुद्धा कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हता, अशी भावना दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी व्यक्त केली.

या पुरस्काराबरोबरच केरळ येथील त्रिच्चूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातसुद्धा ‘प्रवास’ चित्रपटाची निवड झाली आहे. ‘प्रवास’ वर होणारा पुरस्कारांचा वर्षाव हा मनाला समाधान देणारा असल्याची भावना निर्माते ओम छांगाणी यांनी बोलून दाखवली. यासोबत ‘प्रवास’ची ‘इफ्फी २०२०’ मध्ये निवड झाल्यबद्दल चित्रपटाचे निर्माते ओम छांगाणी यांना ‘प्राईड ऑंफ राजस्थान’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

आयुष्याच्या प्रवासाचा एक आगळावेगळा दृष्टिकोन दाखविणाऱ्या ‘प्रवास’ चित्रपटामध्ये अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापुरे, विक्रम गोखले, श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जोधपूरच्या प्रसिद्ध मेहरानगड किल्ल्यात संपन्न झालेल्या रंगतदार सोहळ्यात ‘प्रवास’ला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा ‘विशेष ज्युरी पुरस्कार’ व शशांक उदापूरकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा - ‘राजा’ आणि ‘रानी’ ‘जोडी’ने खेळणार होळी!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.