ETV Bharat / sitara

'अश्विनी ये ना'.. हे गाणं गायला किशोर कुमारांनी 'या' कारणासाठी दिला होता नकार..

'ये रे ये रे पैसा- 2' या सिनेमाचे म्युझिक नुकतंच लाँच करण्यात आले. या सिनेमात 'अश्विनी ये ना..' हे गाणं रिक्रिएट करून वापरण्यात आले आहे.

म्युझिक लाँच
author img

By

Published : Jul 19, 2019, 9:54 AM IST

मुंबई - 'अश्विनी ये ना'..हे 'गंमत जम्मत' सिनेमातील हे सुपरहिट गाणं किशोर कुमार यांनी गायले होते, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, हे गाणं गायला आधी किशोर कुमार यांनी ठामपणे नकार दिला होता. हा नकार होकारामध्ये नक्की कसा बदलला याचा मोठा खुमासदार किस्सा या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी पुन्हा सांगितला.

ये रे ये रे पैसा- 2 सिनेमाचे म्युझिक लाँच

झालं अस की या मराठी गाण्याचं प्रपोजल घेऊन सचिन हे किशोरदांना भेटले. मात्र, त्यांनी हे गाणं गायला ठाम नकार दिला. सचिनजींना यामागचं कारण विचारलं असता, तुमच्या प्रत्येक मराठी गाण्यात 'स' आणि 'च' च्या मध्ये एक शब्द असतो अस हे किशोरदा बोलले. सचिन म्हणाले, अहो असा मराठीत एकही शब्द नाही. त्यावर किशोरदांनी तुम्ही 'चमचा' कस म्हणता असे विचारून तो 'च' आपल्याला उच्चरता येत नाही असे त्यांनी सांगितलं, तसेच तुमच्या मराठीत 'ड' आणि 'द' असा काहीतरी शब्द असतो, त्यावर सचिनजी म्हणाले, अहो असा कोणताच शब्द नसतो! त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की की ते 'ळ' बद्दल बोलत आहेत.

त्यानंतर सचिनजींनी त्यांना तुम्ही गाण्याचा जो भाग गाणार त्यात 'च' आणि 'ळ' हे शब्द नसतील तर..?? असे विचारले. त्यावर आपण हे गाणं नक्की गाऊ असे किशोर कुमार यांनी सांगितले. नंतर ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर यांच्याकडून तसं गाणं लिहून घेण्यात आलं. त्यानंतर मेहबूब स्टुडिओत ते रेकॉर्डिंग करण्यात आले, असा किस्सा सचिनजींनी यावेळी सांगितला.

आता तेच गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे. या नव्याने तयार केलेल्या गाण्याला या तिघांनी शुभेच्छाही दिल्या. अमेय खोपकर प्रोडक्शन्सची निर्मिती असलेल्या 'ये रे ये रे पैसा- 2' या सिनेमाचं म्युझिक नुकतंच लाँच करण्यात आले. या सिनेमात 'अश्विनी ये ना..' हे गाणं रिक्रिएट करून वापरण्यात आले आहे. यानिमित्ताने जुन्या गाण्याची संपूर्ण टीम एकत्र आली होती. यावेळी सचिन पिळगावकर, अशोक सराफ, आणि चारुशीला साबळे यांनी या गाण्याची निर्मितीकथा पुन्हा एकदा उलगडून सांगितली.

'ये रे ये रे पैसा' या सिनेमाचा पहिला भाग कमालीचा यशस्वी ठरला होता. त्यानंतर त्याचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या भागात हे गाणं अवधूत गुप्ते आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी गायलं आहे, तर आरिफ आणि ट्रॉय यांच्या जोडीने या गाण्याला संगीत दिलं आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित या सिनेमात संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, विशाखा सुभेदार आणि स्मिता गोंदकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Intro:'अश्विनी ये ना'..हे 'गंमत जम्मत' सिनेमातील सुपरहिट गाणं किशोर कुमार यांनी गायलं होत हे तर आपल्या सगळयांनाच माहीत आहे. मात्र हे गाणं गायला आधी किशोर कुमार यांनी ठामपणे नकार दिला होता. हा नकार होकारामध्ये नक्की कसा बदलला याचा मोठा खुमासदार किस्सा या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी पुन्हा सांगितला.

झालं अस की या मराठी गाण्याचं प्रपोजल घेऊन सचिन हे किशोरदाना भेटले. मात्र त्यांनी हे गाणं गायला ठाम नकार दिला. सचिनजींनी यामागचं कारण विचारलं असता तुमच्या प्रत्येक मराठी गाण्यात 'स' आणि 'च' च्या मध्ये एक शब्द असतो. सचिनजी म्हणाले अहो असा मराठीत एकही शब्द नाही. त्यावर किशोरदानी तुम्ही 'चमचा' कस म्हणता अस विचारून तो 'च' आपल्याला उच्चरता येत नाही असं सांगितलं, तसच तुमचा मराठीत 'ड' आणि 'द' असा काहितरी शब्द असतो, सचिनजी म्हणाले अहो असा कोणताच शब्द नसतो मग लक्षात आलं की ते 'ळ' बद्दल बोलतायत. त्यानंतर सचिनजींनी त्याना जर तुम्ही गाण्याचा जो भाग गाल त्यात 'च' आणि 'ळ' हे शब्द नसतील तर..?? तर मग आपण हे गाणं नक्की गाऊ अस किशोर कुमार यांनी सांगितलं. त्यानंतर ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर यांच्याकडून तस गाणं लिहून घेण्यात आल.आणि त्यांनंतर मेहबूब स्टुडिओत ते रेकॉर्डिंग करण्यात आलं.असा किस्सा सांगितला. या नव्याने तयार केलेल्या गाण्याला या तिघांनी शुभेच्छाही दिल्या.

अमेय खोपकर प्रोडक्शन्सची निर्मिती असलेल्या 'ये रे ये रे पैसा- 2' या सिनेमाचं म्युझिक नुकतंच लाँच करण्यात आलं.. या सिनेमात 'अश्विनी ये ना..' हे गाणं रिक्रिएट करून वापरण्यात आलंय. यानिमित्ताने जुन्या गाण्याची संपूर्ण टीम एकत्र आली होती. यावेळी सचिन पिळगावकर, अशोक सराफ, आणि चारुशीला साबळे यांनी या गाण्याची निर्मितीकथा पुन्हा एकदा उलगडून सांगितली.

'ये रे ये रे पैसा' या सिनेमाचा पहिला भाग कमालीचा यशस्वी ठरला होता त्यानंतर त्याचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या भागात हे गाणं अवधूत गुप्ते आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी गायलंय. तर आरिफ आणि ट्रॉय यांच्या जोडीने या गाण्याला संगीत दिलं आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या सिनेमात संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, विशाखा सुभेदार आणि स्मिता गोंदकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.