मुंबई - लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा अभिनय बेर्डेचा आगामी 'अशी ही आशिकी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेम, कन्फेशन, इमोशन आणि 'अशी ही आशिकी', अशी दमदार टॅगलाईन असलेला चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आताच्या काळातील प्रेमाची बदललेली व्याख्या तसेच अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री हेमल इंगळेचे हसायला भाग पाडणारे संवाद या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. हेमल या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. अभिनयने यापूर्वीच 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. यातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली होती. आता त्याची 'अशी ही आशिकी' पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
गुलशन कुमार प्रस्तुत, टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन पिळगावकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे ही जोडी या चित्रपटात स्क्रिन शेअर करत आहेत. १ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात नेमके काय हॅपनिंग पाहायला मिळणार, याविषयीदेखील चाहत्यांच्या मनात कुतुहल निर्माण झाले आहे.