मुंबईः अभिनेता अर्जुन रामपालने सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपल्या आगामी 'नेल पॉलिश' चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. हा एक आव्हानात्मक अनुभव असल्याचे त्याने म्हटलंय.
“हे अत्यंत आव्हानात्मक आहे. प्रॉडक्शन टीमपासून ते कलाकार यांच्यासाठी हे काम आव्हानात्मक आहे. झी५ने ९ सहकलाकारांसह मोठी जोखीम घेऊन हे काम सुरू केलंय. मानव कौल आणि आनंद तिवारी यांना कोविडची लागण झाली, त्यानंतर तीन आठवड्यासाठी शुटिंग थांबवण्यात आले होते.", अर्जुन म्हणाला.
तो पुढे म्हणाले: "स्वतःला सावरत सर्वांनी पुन्हा एकत्र येऊन धाडसाने परिस्थी हाताळणे याचा आम्हा सर्वांना अनुभव आला. या कठिण काळात झगडत, जे काही आम्ही सुरू केले आहे ते काम पूर्ण करताना खूप बरे वाटले."
या चित्रपटाची कहाणी प्रवासी मुलाच्या हत्येभोवती फिरणारी आहे. ही एका प्रभावशाली माणसाची कथा आहे आणि बचाव करणारा वकिल रहस्य उलगताना कशी भूमिका बजावतो याचीही गोष्ट आहे.
हेही वाचा - बिग बॉस १४: सोनाली फोगटची बिग बॉसच्या घरात एन्ट्री
'नेल पॉलिश' या चित्रपटात रजित कपूरचीही भूमिका असून भार्गव कृष्णा याचे दिग्दर्शन करीत आहेत. १ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - 'कुली नंबर १' मधील 'तुझको मिर्ची लगी' गाणे रिलीज