ETV Bharat / sitara

'मन मे शिवा': अजय - अतुल यांचं संगीत असलेलं 'पानिपत'चं गाणं प्रदर्शित - ajay atul music in panipat

मराठमोळ्या अजय - अतुल या जोडीचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या संगीताचा डंका वाजवल्यानंतर अजय - अतुल या जोडीने हिंदी सिनेसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे.

'मन मे शिवा': अजय - अतुल यांचं संगीत असलेलं 'पानिपत'चं गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Nov 23, 2019, 6:44 PM IST

मुंबई - अभिनेता अर्जुन कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'पानिपत' चित्रपटाती बरीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच प्रेक्षकांना चित्रपटाविषयी आतुरता निर्माण झाली आहे. पानिपतच्या युद्धाची शौर्यगाथा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील गाण्यांनाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतचं या चित्रपटातील दुसरं गाणं 'मन मे शिवा' हे प्रदर्शित करण्यात आलं आहे.

मराठमोळ्या अजय - अतुल या जोडीचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या संगीताचा डंका वाजवल्यानंतर अजय - अतुल या जोडीने हिंदी सिनेसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे. बऱ्याच हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठी त्यांनी आपलं संगीत दिलं आहे. पानिपतच्या पहिल्या गाण्यातही त्यांच्या संगीताची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. अर्जुन कपूर आणि क्रिती सेनॉन यांची केमेस्ट्रीही या गाण्यात पाहायला मिळते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -कियारा आडवाणीच्या 'इंदु की जवानी'चं शूटिंग पूर्ण

जावेद अख्तर यांनी या गाण्याचे बोल लिहले आहेत. तर, कुणाल गांजावाला, दीपांशी नागर, पद्मनाभ गायकवाड यांनी हे गाणं गायलं आहे.

'पानिपत' चित्रपटात मराठा सैन्यातील शूरवीर सदाशिवराव भाऊ यांची कथा दाखवण्यात येणार आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शाह अब्दालीसोबत झालेल्या घनघोर युद्धात त्यांनी आपलं शौर्य पणाला लावलं होतं. अर्जून कपूर हा सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे.

तर, अभिनेत्री क्रिती सेनॉन ही पार्वती बाईंची भूमिका साकारत आहे. यामध्ये पद्मीनी कोल्हापुरे, मोहनीश बहल, कुणाल कपूर आणि झिनत अमान यांचीही महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.

आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन असलेला 'पानिपत' हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -'जयललिता' यांच्या भूमिकेतील कंगनाची पहिली झलक, पाहा खास व्हिडिओ

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.