मुंबई - बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेले कपल म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट. दोघेही फिल्मी खानदानातले व अखंड एकमेकांच्या प्रेमात बुडालेले. याच वर्षी दोघांनीही रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल केले होते. त्यांचे लग्नही यावर्षी झाले असते. परंतु कोरोना मध्यात आला व त्यांना लग्न पुढे ढकलावे लागले.
सालाबादप्रमाणे यावर्षीही कपूर खानदान क्रिसमससाठी एकत्र आले होते व आलियासुद्धा यावेळी हजेरी होती. त्यानंतर लगेचच कपूर कुटुंबिय फॅमिली व्हेकेशनसाठी बाहेर पडली. ज्यात नीतू कपूर, रिद्धिमा, तिचा नवरा भरत साहनी, रणबीर, आलिया, तिची बहीण शाहीन आणि इतर कुटुंबीय होते. ते सर्व राजस्थानातील रणथंबोरमध्ये गेले आहेत, नववर्षाचे स्वागत करायला.
साधारणतः हे फिल्मी लोक पाश्चिमात्य नवीन वर्ष विदेशात साजरं करतात. परंतु कोरोनामुळे कोणीही भारताबाहेर जाऊ शकत नाहीये. रणथंबोरमध्ये दीपिका पदुकोण व रणवीर सिंग सुद्धा सुट्ट्या घालवत आहेत. कपूर मंडळी 'अमन-ई-खास' या रिसॉर्टमध्ये रहात असून दीपिका-रणवीर 'वन्यविलास' रिसॉर्टमध्ये रहात आहेत. जर का लॉकडाऊन नसता तर एव्हाना माझे व आलियाचे लग्न झालेले असते, असे रणबीर कपूर नुकताच वदला होता. त्यामुळेच संपूर्ण रणबीर फॅमिली व भट्ट कुटुंबीय रणथंबोरमध्ये रणबीर व आलियाचा साखरपुडा उरकणार? अशा चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, याला नकार दिला जातोय. परंतु बऱ्याचदा फिल्मी लोक ज्या गोष्टी नाकारत असतात त्या सत्यतेत उतरताना अनेक वेळा पाहिले गेलयं. त्यामुळे रणबीर कपूर आणि आलिया भट मुंबईत परतताना वाङनिश्चय करून आल्यास नवल वाटायला नको.
हेही वाचा - २०२० : सर्वाधिक कमाई 'तान्हाजी' आणि 'बागी ३' ची, १०० कोटी क्लबमध्ये केवळ २ सिनेमे
हेही वाचा - रणबीर कपूर आणि आलिया भट्टची रणथंभोरमध्ये होणार एंगेजमेंट?