मुंबई - कला आणि क्रीडा विश्वातील पॉवर कपल म्हणून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी ओळखली जाते. सोशल मीडियामध्येही त्यांच्या फोटोंची क्रेझ पाहिली जाते. सध्या विराट आणि अनुष्का दोघेही एकमेकांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. दोघेही स्वित्झर्लंडला रवाना झाले आहे. लवकरच नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोघेही स्वित्झर्लँड येथे नववर्षाचे स्वागत करणार आहेत.
विराटने अनुष्कासोबतचे फोटो शेअर करून खास पोस्टही लिहिली आहे. 'खऱ्या आयुष्यात फक्त प्रेम ही एकमेव गोष्ट तुमच्यासोबत असते. जेव्हा देव त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पाठवतो, तेव्हा प्रत्येक दिवस त्याची कृतज्ञता मानायला हवी'.
हेही वाचा -कंगना रनौत, करिना कपूरचं विंटर सेशन, कडाक्याच्या थंडीत अशी करताहेत धमाल
अनुष्काने देखील तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, अनुष्का लवकरच नेटफ्लिक्सच्या वेबसीरिजमध्ये भूमिका साकारणार आहे. 'झिरो' चित्रपटानंतर बऱ्याच काळानंतर ती वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा -बॉलिवूड २०२० : नववर्षात 'हे' चित्रपट देतील बॉक्स ऑफिसवर टक्कर