ETV Bharat / sitara

'अनुष्का- विराट'ने आसाम, बिहारमधील पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे केले आवाहन - अनुष्का शर्मा आणि विराट कोहली

बिहारमधील पुरामुळे तब्बल 38 लाख 47 हजार 531 लोकांना फटका बसला आहे. तसेच 25 हजार 116 लोक निवारा गृहात आहेत, असे बिहार सरकारने म्हटले आहे. आसाममधील पूर अहवालानुसार ५३०५ खेड्यांमधून एकूण ५६ लाख ७१ हजार २९ लोकांना पुराचा फटका बसला आहे.

Anushka Sharma, Virat Kohli
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली
author img

By

Published : Jul 30, 2020, 4:43 PM IST

मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्मा व तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहली यांनी आसाम, बिहार येथील पूरग्रस्तांना मदत केली आहे. तसेच त्या राज्यातील पूरगस्तांच्या मदतीसाठी लोकांनी पुढे येण्याचे आवाहन या जोडीने केले आहे.

कोहलीसमवेत अभिनेत्री अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांनी मदत निधीसाठी देणगी देण्याचे वचन दिले आहे आणि लोकांनाही यात योगदान देण्याचे आवाहन केले आहे. त्यामध्ये असे लिहिलंय, "आपला देश कोरोना व्हायरस या आजाराने ग्रस्त आहे, तर आसाम आणि बिहारमधील लोकही अशा अनेक प्रलयंकारी पुरामुळे त्रस्त आहेत, ज्याने अनेक लोकांचे जीवनमान बाधित केले आहे."

यात पुढे म्हटले आहे की, “आम्ही आसाम आणि बिहारमधील लोकांसाठी प्रार्थना करत असताना, मी आणि विराटने विश्वासार्ह अशा या तीन संघटनांना (अ‍ॅक्शन एड इंडिया, रॅपिड रिस्पॉन्स आणि गोंज) आधार देऊन गरजूंना मदत करण्याचे वचन दिले आहे."

या जोडप्याने नागरिकांना या दोन्ही राज्यांतील लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "कृपया या संस्थांच्या माध्यमातून या राज्यांना मदत करण्यासाठी संपर्क साधा."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.