ETV Bharat / sitara

अनुष्काचा आजार पुन्हा बळावला, 'या' आजाराने आहे त्रस्त - worldcup

अनुष्का बऱ्याच काळापासून एका आजाराने त्रस्त आहे. यापूर्वीही तिच्या आजारासंबधीचे वृत्त समोर आले होते. याच आजारावर सध्या ती उपचार घेत आहे.

अनुष्काचा आजार पुन्हा बळावला, 'या' आजाराने आहे त्रस्त
author img

By

Published : May 21, 2019, 8:28 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती क्लीनिकमध्ये जाताना दिसत आहे. अनुष्का बऱ्याच काळापासून एका आजाराने त्रस्त आहे. यापूर्वीही तिच्या आजारासंबधीचे वृत्त समोर आले होते. याच आजारावर सध्या ती उपचार घेत आहे.

अनुष्काला 'बल्जिंग डिस्क' नावाचा आजार आहे. हा आजार कंबरेसंबधी आहे. या आजारामुळे व्यक्ती एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू शकत नाही. जो एकाच जागेवर जास्त वेळ बसून काम करतो, त्याला हा आजार होण्याची शक्यता असते. अनुष्कालाही याच आजाराने ग्रासले आहे. या आजारावर उपचार घेण्यासाठी ती क्लीनिकच्या बाहेर दिसून आली.

Anushka Sharma
अनुष्का शर्मा

अलिकडेच अनुष्का आणि विराट कोहलीचे काही फोटो देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. गोव्यामध्ये त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवला. ३० मे पासून आयसीसी वर्ल्ड कप सुरू होणार आहे. त्यामुळे विराट सध्या अनुष्कासोबत वेळ घालवताना दिसत आहे.

अनुष्काने 'झिरो' चित्रपटानंतर एकही चित्रपट अद्याप साईन केलेला नाही. तिला एका दमदार कथेची प्रतिक्षा आहे. त्यामुळे जोपर्यंत चांगली स्क्रिप्ट येत नाही, तोपर्यंत ती चित्रपटात सध्यातरी दिसणार नाही.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.