मुंबई - आयसीसी क्रिकेट विश्वचषकामध्ये भारताचा न्युझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघात फूट पडल्याचे बोलले गेले. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली असे दोन गट पडल्याचेही समोर आले होते. मात्र, बीसीसीआयने यावर स्पष्टीकरण देत हे वृत्त फेटाळले होते. मात्र, रोहितने विराट कोहलीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे या प्रकरणाची आणखी चर्चा झाली.
विश्वचषकातील पराभवानंतर रोहित त्याच्या पत्नीसोबत लंडनमधुन मुंबईला परत आला होता. तर, विराट मात्र, अनुष्का शर्मासोबत तिथेच राहिला होता. आता रोहितने विराटनंतर त्याची अनुष्कालाही इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. त्यानंतर अनुष्कानं एक पोस्ट आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिलंय, की 'एक व्यक्ती काहीच बोलला नाही. खोट्या देखाव्याच्या गोंधळात शांत राहणंच योग्य'.
![Anushka Sharma reacts on social media after unfollowed by rohit sharma](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3954550_anu2.jpg)
अनुष्कानं ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या या पोस्टवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.