ETV Bharat / sitara

चंकी पांडेंच्या वाढदिवसानिमित्त अनन्याने शेअर केल्या खास आठवणी, पाहा फोटो - ananya panday upcomming films

चंकी पांडे यांची पत्नी भावना यांनीही त्यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. अनन्याने भावना यांचा हा फोटो रिपोस्ट करुन आपल्या आईवडिलांच्या या अंदाजाचं कौतुक केलं आहे.

चंकी पांडेंच्या वाढदिवसानिमित्त अनन्याने शेअर केल्या खास आठवणी, पाहा फोटो
author img

By

Published : Sep 26, 2019, 12:47 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांचा आज ५७ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे हिने सोशल मीडियावर काही आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांची पत्नी भावना पांडे यांनी देखील काही फोटो शेअर करुन चंकी पांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

चंकी पांडे यांची पत्नी भावना यांनी त्यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. 'जेव्हा आम्ही आमच्या पार्टीच्या थिम आम्ही खूप सिरिअस घेत होतो', असं कॅप्शन देऊन त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.

अनन्याने भावना यांचा हा फोटो रिपोस्ट करुन आपल्या आईवडिलांच्या या अंदाजाचं कौतुक केलं आहे. तसंच तिनेही तिच्या इन्स्टाग्रामवर काही खास आठवणींना उजाळा देत फोटो शेअर केले आहेत.

Ananya Panday shares memories
अनन्याने भावना यांचा हा फोटो रिपोस्ट केला आहे.

हेही वाचा -पाहा 'हाऊसफुल'चं नवं पोस्टर, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

चंकी पांडे यांनी बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या विनोदशैलीमुळे ते लोकप्रिय आहेत. हाऊसफूल सिरीजमध्येही ते झळकले. तसंच 'रेडी', 'हिम्मतवाला' यांसारख्या चित्रपटातही त्यांनी आपल्या कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवलं. अलिकडेच रिलीज झालेल्या 'प्रस्थानम' चित्रपटातही ते विलनच्या भूमिकेत झळकले. आता 'हाऊसफुल ४'मध्येही त्यांची भूमिका पाहायला मिळणार आहे.

त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अनन्यानेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 'स्टूडंट ऑफ द ईयर २' चित्रपटात ती टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांच्याबरोबर झळकली. लवकरच ती कार्तिक आर्यनसोबत 'पती, पत्नी और वो' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. याशिवाय, ईशान खट्टरसोबतही ती 'खाली पिली' चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचा -हृतिक - टायगरच्या 'वॉर'साठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.