मुंबई - १०० टक्के बिनधास्त... १०० टक्के चुलबुली... आणि १०० टक्के मॅरेज मटेरियल... असलेल्या 'पूर्वी'ला भेटण्याची उत्सुकुता प्रेक्षकांना 'मेकअप'चे पोस्टर झळकल्यापासूनच लागली होती. रिंकू राजगुरू या चित्रपटात 'पूर्वी'ची भूमिका साकारत असल्यामुळे तिचा बिनधास्तपणा पाहण्याची प्रेक्षकांना आतुरता आहे. टिझरमधील तिची झलक बघून ही उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यानंतर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनेही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही रिंकूच्या 'मेकअप'चा ट्रेलर आवडला आहे. त्यांनी या ट्रेलरची लिंक सोशल मीडियावर शेअरही केली आहे. केवळ बिग बीच नाही, तर इशा देओल, आफताब शिवदासानी यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर केला आहे. त्यामुळे आता बॉलिवूडही 'मेकअप'च्या रंगात रंगले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
-
T 3599 - Marathi film Make up starring Rinku Rajguru of Sairath fame., Produced by friend Kaleem ..https://t.co/6QOTleozjI@zkrulz59@ThefilmMakeup
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">T 3599 - Marathi film Make up starring Rinku Rajguru of Sairath fame., Produced by friend Kaleem ..https://t.co/6QOTleozjI@zkrulz59@ThefilmMakeup
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 2, 2020T 3599 - Marathi film Make up starring Rinku Rajguru of Sairath fame., Produced by friend Kaleem ..https://t.co/6QOTleozjI@zkrulz59@ThefilmMakeup
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 2, 2020
हेही वाचा -नितीन वैद्य यांच्या 'दशमी क्रिएशन्स'कडून नव्या सिनेमाची घोषणा
ट्रेलरमध्ये एकीकडे लग्नासाठी मुले बघत, त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी दुसरीकडे मात्र बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसतेय. त्यामुळे यातील खरी पूर्वी कोण, मेकअप'वाली पूर्वी कोण आणि मुळात पूर्वीचा हा मेकअप कशासाठी आहे, हे जरा प्रेक्षकांना विचार करायला लावणारे आहे. ट्रेलर पाहता हा चित्रपट फूल टू धमाल दिसत आहे. मात्र यात काही ट्विस्टही दिसत आहेत. हे ट्विस्ट नेमके कोणते आणि स्वप्नातल्या राजकुमाराची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पूर्वीच्या आयुष्यात तिचा 'हॉट' राजकुमार येणार का, हे चित्रपट आल्यावरच कळेल.
या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिन्मय या सिनेमात पहिल्यांदाच डॉक्टरच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.
हेही वाचा -'तत्ताड' सिनेमाचं पहिलं लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित, तगडी स्टारकास्ट
सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन पल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे पॅकेज असणाऱ्या या चित्रपटात प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ आदी चेहरेही झळकणार असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.