ETV Bharat / sitara

IFFI 2019: ईफ्फीच्या सुवर्ण महोत्सवात बिग बींनी व्यक्त केल्या भावना - IFFI 2019 at goa

२० नोव्हेंबरला ईफ्फीच्या उद्घाटनप्रसंगी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी हजेरी लावली होती.

IFFI 2019: ईफ्फीच्या सुवर्ण महोत्सवात बिग बींनी व्यक्त केल्या भावना
author img

By

Published : Nov 21, 2019, 4:50 PM IST

Updated : Nov 21, 2019, 10:22 PM IST

पणजी - 'ईफ्फी' महोत्सवाचं यंदा ५० वे वर्ष आहे. गोव्यात या महोत्सवाचं दिमाखदार उद्घाटन झालं आहे. या उद्घाटन प्रसंगी महानायक अमिताभ बच्चन यांची खास उपस्थिती होती. ईफ्फीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बिग बींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.'देशाला एकत्रित आणणाऱ्या काही मोजक्या माध्यमांपैकी चित्रपट असे माध्यम आहे, जे रंग, जात, धर्म बाजूला ठेवत लोकांना एकत्रित आणते. नव्या कलाकृती आणि निर्मिती स्वीकारून पुढे जाण्याचा संदेश देते, असे मत महानायक अमिताभ बच्चन यांनी यावेळी व्यक्त केले. चित्रपट कारकिर्दीची 50 वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर ईफ्फी आयोजक आणि गोवा सरकार यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

IFFI 2019: ईफ्फीच्या सुवर्ण महोत्सवात बिग बींनी व्यक्त केल्या भावना

यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह देऊन बच्चन यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई उपस्थित होते.

उद्घाटनाप्रसंगी बोलत असताना ते म्हणाले, '१९६९पासून माझ्या चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली. पहिल्या चित्रपटाचे चित्रिकरण गोव्यातच झाले होते. त्यानंतर गोव्याने काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. येथील आदरातिथ्य भारावून टाकणारे आहे. चित्रपट महोत्सवात जगभरातील चित्रपट पाहण्याची संधी मिळत असते. जगात या क्षेत्रात सुरू असलेले काम आणि निर्मिती अनुभवता येते. कारण याला भाषेचे बंधन नाही.

चित्रपट सामाजिक जिवनात खुप प्रभावी भूमिका निभावत असतात, असे सांगून बच्चन म्हणाले, चित्रपट समाज आणि देशाला एकत्रित जोडत एकतेची भावना निर्माण करणाऱ्या माध्यमांपैकी एक आहे. कारण चित्रपट गृहातील अंधारात आपल्या समोर कोणत्या जात, धर्माची व्यक्ती बसली आहे हे पाहत नाही. बदलत्या जगात अशी मोजकीच माध्यमे शिल्लक आहेत. रंग, जात, धर्म बाजूला ठेवत नवनिर्मिती आणि कलाकृती स्वीकारत हातात हात घालून पुढे जाण्याचा संदेश हे माध्यम देत असते', अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

  • The 50th @IFFIGoa got underway with a spectacular opening ceremony in the presence of eminent film personalities from India & around the world. People of Goa would enjoy this Golden Jubilee edition, having several entertainment activities specially designed for general public. pic.twitter.com/nJ7bLVqFpD

    — Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) November 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ईफ्फीच्या या सुवर्णमहोत्सवात बिग बींच्या काही खास चित्रपटाचं स्क्रिनिंग होणार आहे. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या आणि आर. बाल्की दिग्दर्शित 'पा' या चित्रपट प्रदर्शनाने सुरुवात होणार असल्याने त्यांनी आपल्याला हा चित्रपट का करावासा वाटला आणि ' प्रोजेरिया' हा आजार काय आहे याची माहिती दिली.

हेही वाचा -IFFI 50 : राजकारण आणि धर्मांधतेमुळ निर्वासितांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर - गोरान पास्कल्जेविक

२० नोव्हेंबरला ईफ्फीच्या उद्घाटनप्रसंगी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हजेरी लावली होती.

करण जोहरने यावेळी सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली. रजनीकांत यांनी आयकॉन ऑफ गोल्डन जुबली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, फ्रान्सचे अभिनेते इसाबेल हुपर्ट यांना देखील विदेशी कलाकार या श्रेणीमध्ये लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यंदा या महोत्सवात ७६ देशांच्या २०० पेक्षा जास्त चित्रपटाचं प्रदर्शन केलं जाणार आहे. यामध्ये २६ फिचर चित्रपटांचा समावेश आहे. जॉन बेली आणि अॅकडमी मोशन पिक्चर्च आर्ट्स अँड सायन्सेसचे पूर्व अध्यक्ष तसेच ईफ्फीचे आंतरराष्ट्रीय जूरी प्रमुख म्हणून उपस्थित राहतील.

हेही वाचा -गोव्यातील ५० व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलची रंगारंग सुरुवात

Intro:Body:

Amitabh bachchan at IFFI 2019 at goa

IFFI 2019: ईफ्फीच्या सुवर्ण महोत्सवात बिग बींनी व्यक्त केल्या भावना

पणजी (गोवा) - 'ईफ्फी' महोत्सवाचं यंदा ५० वे वर्ष आहे. गोव्यात या महोत्सवाचं दिमाखदार उद्घाटन झालं आहे. या उद्घाटन प्रसंगी महानायक अमिताभ बच्चन यांची खास उपस्थिती होती. ईफ्फीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बिग बींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

उद्घाटनाप्रसंगी बोलत असताना ते म्हणाले, '१९६९ साली मी या सृष्टीत पदार्पण केलं. या प्रवासाला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच 'ईफ्फी'चे देखील हे सुवर्ण महोत्सव आहे. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो'.

ईफ्फीच्या या सुवर्णमहोत्सवात बिग बींच्या काही खास चित्रपटाचं स्क्रिनिंग होणार आहे. 

२० नोव्हेंबरला ईफ्फीच्या उद्घाटनप्रसंगी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी हजेरी लावली होती. 

करण जोहरने यावेळी सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली. रजनीकांत यांनी आयकॉन ऑफ गोल्डन जुबली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, फ्रान्सचे अभिनेते इसाबेल हुपर्ट यांना देखील विदेशी कलाकार या श्रेणीमध्ये लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

यंदा या महोत्सवात ७६ देशांच्या २०० पेक्षा जास्त चित्रपटाचं प्रदर्शन केलं जाणार आहे. यामध्ये २६ फिचर चित्रपटांचा समावेश आहे. जॉन बेली आणि अॅकडमी मोशन पिक्चर्च आर्ट्स अँड सायन्सेसचे पूर्व अध्यक्ष तसेच ईफ्फीचे आंतरराष्ट्रीय जूरी प्रमुख म्हणून उपस्थित राहतील.

Conclusion:
Last Updated : Nov 21, 2019, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.