मुंबई - झी मराठी वाहिनीवरील “मन उडू उडू झालं” ही नवी मालिका प्रेक्षकांना आवडतेय, हे प्रेक्षकांच्या मालिकेला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादावरून कळतंय. या मालिकेतील सगळ्याच भूमिका या अतिशय दर्जेदार रित्या झालेल्या आहेत. प्रेक्षक या मालिका तसेच त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेतील एक लक्षवेधी व्यक्तिरेखा म्हणजे नयन कानविंदे. अभिनेता अमित परब ही व्यक्तिरेखा अगदी चोख बजावतोय. अमित याने एम.बी.ए. केलं आहे आणि कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत आहे. बाबांची सरकारी नोकरी आणि आई गृहिणी असल्यामुळे घरामध्ये अभिनयाची पार्श्वभूमी नाही. पण अमित हा जॉब करून 'मन उडू उडू झालं' या मालिकेमध्ये काम करतोय.
नौकरी सांभाळत करतो अभिनय
अमित पुढे म्हणाला, “सुरुवातीला २ वर्ष प्रयत्न करून बघ आणि काहीच नाही झालं तर पुन्हा जॉब कर असा सल्ला आधी त्यांनी मला दिला होता. आवड, योगायोग आणि माझी मेहनत यामुळे २ वर्षाच्या आत मला ब्रेक मिळाल्यामुळे मी जरा रिलॅक्स झालोय. लॉकडाऊन लागल्यावर मला खूप वेळ मिळाला. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला माझ्या अभिनयाच्या प्रॅक्टिससाठी देखील वेळ देता आला. नयन या भूमिकेसाठी मी व्हिडीओ पाठवून ऑडिशन दिलं आणि ही भूमिका मला मिळाली. प्रेक्षकांना माझं काम आवडत असल्याचं मला समाधान आहे.
हेही वाचा - 'या' संगीतकाराने लता मंगेशकरबद्दल अपमानास्पद भाषा वापरली होती, तेव्हा....