ETV Bharat / sitara

'ही' आहे सलमानच्या अगदी जवळची व्यक्ती, प्रदर्शनापूर्वीच पाहिला 'भारत' - atul agnihotri

'भारत' चित्रपटात सलमान खानची विविध रूपे पाहायला मिळणार आहेत. त्याच्या लहानपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंतच्या भूमिका या चित्रपटात दिसणार आहेत.

भारत
author img

By

Published : May 4, 2019, 6:07 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'दबंग' स्टार सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच काळापासून उत्सुकता आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटातील दोन गाणी आणि ट्रेलरला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सलमान खानच्या एका जवळच्या व्यक्तीला प्रदर्शनापूर्वीच 'भारत' चित्रपट दाखवण्यात आला आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी स्वत:च याबाबत खुलासा केला आहे.

'भारत' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सलमान खानची भाची अलीजा अग्निहोत्री हिला हा चित्रपट दाखवण्यात आला. यामागचं कारण सांगताना अली अब्बास जफर म्हणाले, 'मी कोणताही चित्रपट बनविल्यानंतर तो एखाद्या तरूण व्यक्तीला दाखवत असतो. जर तो चित्रपट त्या व्यक्तीला आवडला, तर त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही तो आवडेल, असे माझे मत आहे. त्यामुळे मी हा चित्रपट अलीजाला दाखवला', असे त्यांनी सांगितले आहे. अलीजा ही 'भारत' चित्रपट पाहणारी पहिली व्यक्ती बनली आहे.

Alizeh Agnihotri
अलीजा अग्निहोत्री

'भारत' चित्रपटात सलमान खानची विविध रूपे पाहायला मिळणार आहेत. त्याच्या लहानपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंतच्या भूमिका या चित्रपटात दिसणार आहेत. अलिकडेच त्याचे या चित्रपटातील दिशा पटाणीसोबतचे 'स्लो मोशन' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. तसेच, कॅटरिनासोबतचे 'चाशनी' गाणेदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. ५ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

Ent news 03

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.