मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने काही दिवसांपूर्वीच संजय लिला भन्साळींच्या 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या चित्रपटातील तिचा फर्स्ट लुकही प्रदर्शित करण्यात आला. मात्र, त्यानंतर ती गंगुबाईच्या सेटवर शूटिंगदरम्यान जखमी झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याबाबत आलियाने मौन सोडत एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात केली असल्याचे तिने या पोस्टमधून सांगितले आहे.
आलियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, की 'मी गंगुबाई चित्रपटाच्या सेटवर जखमी झाल्याचे जे वृत्त काही माध्यमांनी छापले आहे, ते पूर्णत: चुकीचे आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वीच मी जखमी झाली होती. माझ्यासोबत काय घडलं, याबद्दल खातरजमा करूनच छापण्यात यावं. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा चित्रीकरण सुरू केले आहे'.
हेही वाचा -'जवानी जानेमन'च्या नव्या पोस्टरमध्ये शर्टलेस अवतारात दिसला सैफ
आलियाने तिच्या चाहत्यांचे आभारही या पोस्टमधून मानले आहेत.

आलिया भट्ट या चित्रपटाच्या निमित्ताने संजय लिला भन्साळींच्या चित्रपटात पहिल्यांदाच झळकणार आहे. हा चित्रपट हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्विन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे.
हेही वाचा -'चेहरे' चित्रपटाची रिलीझ डेट पुन्हा बदलली, 'गुलाबो सिताबो' चित्रपटासोबतची टक्कर टळली