वॉशिंग्टन - प्रसिध्द गीतकार आणि 'आय लव रॉक एन रॉल' या गाजलेल्या मुळ गाण्याचे गायक अॅलन मेरिल यांचे रविवारी कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. या बातमीला त्यांची मुलगी लॅरा मेरिल यांनी दुजोरा दिला आहे. फेसबुकवरुन त्यांनी ही बातमी जगाला दिली. लॅरा मेरिल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ''मी धावत आले आणि मला गुडबाय म्हणण्यासाठी दोन मिनिटे मिळाली. त्यांचे मन शांत वाटत होते.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दिवंगत अॅलन मेरिल हे 'द अॅरो' या लोकप्रिय बँडचे सदस्य होते. या बँडमध्ये सहभागी झाल्यानंतर लगेचच त्यांनी 'आय लव रॉक एन रॉल' गायले हे गीत १९७४ मध्ये रिलीज झाले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अमेरिकन गायक जोआन जेट यांनी शोक व्यक्त करताना लिहिलंय, ''मला आत्ता कळले की मेरिल यांचे निधन झाले. त्याचा परिवार, मित्र आणि संगीत उद्योगाला माझे प्रेम आणि सहानुभूती. मला अजूनही लंडनमध्ये टीव्हीवर पाहिलेला 'अॅरो' आठवणीत आहे. दुःखाने त्यांच्या अंतिम प्रवासाला अलविदा.''
मेरिल यांच्या शिवाय ग्रमी पुरस्कार विजेते जो डेफी यांचेही कोरोना व्हायरसने निधन झाले आहे. ते ६१ वर्षांचे होते. याशिवाय कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यामध्ये जपानी कॉमेडियन केन शिमुरा आणि अभिनेता मार्क ब्लम यांचाही समावेश आहे.