मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा या वर्षातील शेवटचा चित्रपट 'गुड न्यूज' २७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यंदाचं वर्ष हे अक्षय कुमारसाठी यशस्वी ठरलं. यावर्षी त्याचे 'केसरी', 'मिशन मंगल' आणि 'हाऊसफुल ४' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. आता वर्षाअखेरीस 'गुड न्यूज' घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'गुड न्यूज' चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच यातील गाणीदेखील चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. यातले 'सौदा खरा खरा' या गाण्याची सध्या क्रेझ पाहायला मिळतेय. विशेषत: अक्षयने यामध्ये केलेला नागीन डान्स तर तुफान हिट झाला आहे. या गाण्याचे शूटिंग करताना नेमकी काय धमाल झाली, त्याचा मेकिंग व्हिडिओ अक्षयने ट्विटरवर शेअर केला आहे.
-
When there's Bhangra involved, it's gotta be fun! #SaudaKharaKhara making out now - https://t.co/dkn5AQiaNr#GoodNewwz #KareenaKapoorKhan @diljitdosanjh @Advani_Kiara @karanjohar @apoorvamehta18 @ShashankKhaitan @raj_a_mehta @NotSoSnob @Sukhbir_Singer @dhvanivinod @DJLIJO
— Akshay Kumar (@akshaykumar) December 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">When there's Bhangra involved, it's gotta be fun! #SaudaKharaKhara making out now - https://t.co/dkn5AQiaNr#GoodNewwz #KareenaKapoorKhan @diljitdosanjh @Advani_Kiara @karanjohar @apoorvamehta18 @ShashankKhaitan @raj_a_mehta @NotSoSnob @Sukhbir_Singer @dhvanivinod @DJLIJO
— Akshay Kumar (@akshaykumar) December 21, 2019When there's Bhangra involved, it's gotta be fun! #SaudaKharaKhara making out now - https://t.co/dkn5AQiaNr#GoodNewwz #KareenaKapoorKhan @diljitdosanjh @Advani_Kiara @karanjohar @apoorvamehta18 @ShashankKhaitan @raj_a_mehta @NotSoSnob @Sukhbir_Singer @dhvanivinod @DJLIJO
— Akshay Kumar (@akshaykumar) December 21, 2019
हेही वाचा -'हाऊसफूल ४' नंतर अक्षय कुमारची पुन्हा 'गुड न्यूज', पाहा धमाल ट्रेलर
या गाण्यात अक्षय सोबत कियारा आडवाणी आणि दलजित दोसांझ यांचाही धमाल डान्स पाहायला मिळतो. तर, सुप्रसिद्ध गायक सुखबीर सिंगचीही झलक यामध्ये पाहायला मिळते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'गुड न्यूज' चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर अक्षय आणि करिनाची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट चर्चेत होता. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरविषयी चाहत्यांना उत्सुकता होती. गरोदरपणाच्या गोंधळामध्ये अक्षय आणि करिनाची कशी त्रेधा तिरपट उडते, याची धमाल झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली.
हेही वाचा -करिना कपूरला 'बेबी फीवर' तर, दलजीत बनलाय हट्टी
राज मेहता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांचा हा पहिलाच दिग्दर्शनीय चित्रपट आहे.