मुंबई - बॉलिवूडवर सध्या अक्षय कुमारचीच जादू पाहायला मिळत आहे. त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहेत. यावर्षी त्याच्या 'केसरी' आणि 'मिशन मंगल' या दोन्हीही चित्रपटांनी १०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर, दिवाळीतही त्याचा 'हाऊसफूल ४' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटानंतरही बऱ्याच चित्रपटांमध्ये अक्षयची वर्णी लागली आहे. आगामी 'लक्ष्मी बाँब' या चित्रपटात तो किन्नराच्या भूमिकेत झळकणार आहे. काही वेळापूर्वीच या चित्रपटातील त्याचा दमदार लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
अक्षय कुमार या फोटोमध्ये साडी घातलेला दिसतो. गळ्यात ताविज, कपाळावर लालभडक कुंकू, चेहऱ्यावर करारी लूक असलेला हा फोटो आहे. सोशल मीडियावर त्याच्या या लूकवर नेटकऱ्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत.
-
Navratri is about bowing to the inner goddess and celebrating your limitless strength.On this auspicious occasion,I am sharing with you my look as Laxmmi.A character I am both excited and nervous about... but then life begins at the end of our comfort zone...isn’t it? #LaxmmiBomb pic.twitter.com/TmL9U1OXdk
— Akshay Kumar (@akshaykumar) October 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Navratri is about bowing to the inner goddess and celebrating your limitless strength.On this auspicious occasion,I am sharing with you my look as Laxmmi.A character I am both excited and nervous about... but then life begins at the end of our comfort zone...isn’t it? #LaxmmiBomb pic.twitter.com/TmL9U1OXdk
— Akshay Kumar (@akshaykumar) October 3, 2019Navratri is about bowing to the inner goddess and celebrating your limitless strength.On this auspicious occasion,I am sharing with you my look as Laxmmi.A character I am both excited and nervous about... but then life begins at the end of our comfort zone...isn’t it? #LaxmmiBomb pic.twitter.com/TmL9U1OXdk
— Akshay Kumar (@akshaykumar) October 3, 2019
अक्षय कुमारने हा फोटो शेअर करुन सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहे. या भूमिकेबाबत आनंदी आणि नव्हर्स असल्याचे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. पण, आपलं आयुष्य हे आपल्या कंम्फर्ट झोनबाहेर असतं, असेही त्याने लिहिलं आहे.
हेही वाचा -पाहा तारा सुतारिया; सिद्धार्थ मल्होत्राची रोमॅन्टिक केमेस्ट्री, 'मरजावां'चं गाणं प्रदर्शित
'लक्ष्मी बाँब'मध्ये अक्षयसोबत किआरा आडवाणीदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. सध्या अक्षय त्याच्या 'हाऊसफूल ४' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचाही ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सेनॉन, क्रिती खारबंदा, पूजा हेगडे हे कलाकार झळकणार आहेत. २६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -हिरकणी टीझर: बाळाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या आईची शौर्यगाथा