ETV Bharat / sitara

अक्षयने एकदाही वाचले नाही ट्विंकलचे पुस्तक, स्वत:च केला खुलासा - housefull 4

अक्षयने ट्विंकल आणि सुप्रसिद्ध लेखक जेफरी आर्चर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अक्षयने एकदाही वाचले नाही ट्विंकलचे पुस्तक, स्वत:च केला खुलासा
author img

By

Published : Jul 11, 2019, 9:38 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची जोडी लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. ट्विंकल खन्ना आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी ती एक लेखिका म्हणून चाहत्यांच्या भेटीला येत असते. आत्तापर्यंत तिचे बरेच पुस्तकं प्रकाशीत झाले आहेत. अक्षय कुमारही तिच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजर असतो. मात्र, गंमत म्हणजे त्याने अजुनही तिचे एकही पुस्तक वाचलेले नाही. याचा खुलासाही त्याने स्वत:च केला आहे.

अक्षयने ट्विंकल आणि सुप्रसिद्ध लेखक जेफरी आर्चर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की 'ट्विंकलचे पुस्तक पैजामा आर फॉरगिव्हिंग' खूप लोकप्रिय झाले आहे. आत्तापर्यंत या पुस्तकाच्या १० लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. तसेच, जेफरी आर्चर यांची 'केन अँड ऐबल' ही कांदबरी देखील लोकप्रिय झाली आहे'.

यासोबतच त्याने हेही सांगितलेय की त्याने अद्याप यापैकी एकही पुस्तक वाचले नाही.

  • Last evening the wife was celebrating hitting the big 100,000 copies sold of her last book, Pyjamas Are Forgiving and Mr. @Jeffrey_Archer was celebrating the 40th anniversary of Kane and Abel. And me? Well, I was just hanging around as I have not read his books or hers 😜 pic.twitter.com/LTY3orQ938

    — Akshay Kumar (@akshaykumar) July 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अक्षयच्या या पोस्टवर चाहत्यांच्या देखील मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सध्या तो त्याच्या आगामी 'मिशन मंगल' चित्रपटात व्यस्त आहे. तसेच रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या शूटिंगमध्येही तो व्यस्त आहे. 'मिशन मंगल' हा चित्रपट १५ ऑगस्टरोजी प्रदर्शित होणार आहे.

'सूर्यवंशी' चित्रपटानंतर तो करिना कपूरसोबत 'गुड न्यूज' चित्रपटात दिसणार आहे. तसेच 'हाऊसफूल ४' चित्रपटातही तो झळकणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.