ETV Bharat / sitara

'खिलाडी' कुमारची मेट्रो राईड, शेअर केला अनुभव - akshay kumar

अक्षयने एक व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्याने त्याच्या मेट्रोचा अनुभव सांगितला.

'खिलाडी' कुमारची मेट्रो राईड, शेअर केला अनुभव
author img

By

Published : Sep 19, 2019, 10:04 AM IST

मुंबई - बऱ्याचदा मुंबईत पावसामुळे लोकलचा वेग मंदावतो. जनजीवनही विस्कळीत होते. मात्र, मेट्रोवर पावसाचा किंवा ट्रॅफिकचा जास्त परिणाम होत नाही. यामुळे वेळही वाचतो. म्हणूनच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानेही मेट्रोने प्रवास केला. त्याचा घाटकोपर ते वर्सोवादरम्यानचा २ तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटात पूर्ण झाला. त्यामुळे त्याने आपला अनुभव चाहत्यांशी शेअर केला आहे.

अक्षयने एक व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्याने त्याच्या मेट्रोचा अनुभव सांगितला. 'ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी एखाद्या बॉसप्रमाणे घाटकोपर ते वर्सोवापर्यंत मेट्रोने प्रवास केला', असं कॅप्शन त्याने या व्हिडिओवर दिलं आहे.

हेही वाचा -संजय लीला भन्साळींच्या 'ईन्शाल्ला'मधून भाईजानची माघार

अक्षय त्याच्या आगामी 'गूड न्यूज' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. काही कामानिमित्त त्याला घाटकोपरवरुन वर्सोवाला जायचं होतं. हा प्रवास २ तासाचा होता. मात्र, मेट्रोने प्रवास करत असल्यामुळे आपल्याला फक्त २० मिनिटातच वर्सोवाला पोहोचता येईल, असं अक्षयनं या व्हिडिओत म्हटलं आहे.

मेट्रोच्या एका कोपऱ्यात उभं राहुन त्याने हा व्हिडिओ शेअर केला. मेट्रोमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांचीही झलक त्याने या व्हिडिओतून दाखवली आहे. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा- आयफा अवार्ड्स २०१९: आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर रणवीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.