ETV Bharat / sitara

'सूर्यवंशी'मध्ये झळकणार 'टीप टीप बरसा'चं रिक्रियेटेड व्हर्जन, अक्षयने दिली माहिती - tanishk bagchi

'टीप टीप बरसा'चं रिक्रियेटेड व्हर्जन तनिष्क बागची कंपोज करणार आहे. तर, फराह खान या गाण्याला कोरियोग्राफ करणार आहे. मुळ गाण्याप्रमाणेच हे गाणे देखील तेवढेच रोमॅन्टिक असणार, असे बोलले जात आहे.

'सूर्यवंशी'मध्ये झळकणार 'टीप टीप बरसा'चं रिक्रियेटेड व्हर्जन, अक्षयने दिली माहिती
author img

By

Published : Jun 20, 2019, 12:57 PM IST

मुंबई - अक्षय कुमार आणि रविना टंडन यांचं आयकॉनिक आणि ग्लॅमरस असलेलं 'टीप टीप बरसा पाणी' या गाण्याचं रिक्रियेटेड व्हर्जन पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटात कॅटरिना कैफ आणि अक्षयवर हे गाणं चित्रीत होणार आहे. ९० च्या दशकात 'मोहरा' चित्रपटात रविना आणि अक्षयवर हे गाणं शूट झालं होतं. आता २५ वर्षानंतर पुन्हा एकदा हे गाणे चाहत्यांना पाहता येणार आहे.

अक्षय कुमारनेच याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. मध्यंतरी 'टीप टीप बरसा पाणी' गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन 'सूर्यवंशी'मध्ये पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता अक्षयनेच याबाबत माहिती शेअर केली आहे.

'हे गाणं माझ्यासाठी आणि माझ्या करिअरसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरलं होतं. जर दुसऱ्या कोणत्या कलाकाराने या गाण्याचं रिक्रियेशन केलं असतं, तर ते मला नक्कीच आवडलं नसतं', असे अक्षयने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

'टीप टीप बरसा'चं रिक्रियेटेड व्हर्जन तनिष्क बागची कंपोज करणार आहे. तर, फराह खान या गाण्याला कोरियोग्राफ करणार आहे. मुळ गाण्याप्रमाणेच हे गाणे देखील तेवढेच रोमॅन्टिक असणार, असे बोलले जात आहे. याबाबत फराह खानने रोहित शेट्टीसोबत चर्चा देखील केली आहे. आता कॅटरिना आणि अक्षयवर हे गाणे कशाप्रकारे चित्रीत केले जाते, हे पाहणे रंजक ठरेल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.