मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांचा 'सिंग इझ किंग' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील 'तेरी ओर' या गाण्याला आजही चाहत्यांची पसंती मिळते. आता अक्षय आणि कॅटरिनाची जोडी पुन्हा एकदा 'सूर्यवंशी' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अलिकडेच दोघेही ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी लहान मुलांच्या भेटीसाठी गेले होते. तिथे त्यांनी लहाना मुलांच्या इच्छेसाठी 'तेरी ओर' गाण्यावर डान्स केला.
अक्षय आणि कॅटरिनाच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा हा डान्स पाहून मुलांनीही जल्लोष केला. यावेळी दोघांनी लहान मुलांना भेटवस्तू देखील दिल्या.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -शाहरुख खानने मानले स्वच्छतादुतांचे आभार, पाहा व्हिडिओ
अक्षय आणि कॅटरिनाने 'नमस्ते लंडन', 'वेलकम', 'सिंग इझ किंग', 'दे दना दन' आणि 'तीस मार खान' यांसारख्या चित्रपटात एकत्र भूमिका साकारल्या आहेत. चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप आवडते. त्यामुळे दोघांनाही पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत.
त्यांचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट २७ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होत आहे. रोहित शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा -कंगना VS वरुण धवन : 'पंगा' आणि 'स्ट्रीट डान्सर'मध्ये कोण मारणार बाजी?