ETV Bharat / sitara

'बाळा' सिनेमातून दिवंगत क्रिकेटपटू अजित वाडेकरांचं होणार अखेरचं दर्शन

क्रिकेटवर आधारलेल्या ‘बाळा’ चित्रपटात क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत ते आपल्याला दिसणार आहेत. युवा खेळाडूंच्या गुणवत्तेची अचूक पारख त्यांना होती.

author img

By

Published : Apr 24, 2019, 8:37 AM IST

क्रिकेटपटू अजित वाडेकरांचं होणार अखेरचं दर्शन

मुंबई - यशस्वी कर्णधार, दर्जेदार प्रशिक्षक आणि उत्तम संघटक अशी ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांची ख्याती. निवृत्तीनंतरही त्यांचे क्रिकेटशी नाते तुटले नाही. चित्रपटाच्या माध्यमातूनही आपले क्रिकेटप्रेम जपत त्यांनी एक विशेष भूमिका ‘बाळा’ या मराठी चित्रपटात साकारली. येत्या ३ मे ला या चित्रपटातून त्यांचं अखेरचं दर्शन प्रेक्षकांना होणार आहे.

क्रिकेटवर आधारलेल्या ‘बाळा’ चित्रपटात क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत ते आपल्याला दिसणार आहेत. युवा खेळाडूंच्या गुणवत्तेची अचूक पारख त्यांना होती. कोणामध्ये किती क्षमता आहे ? हे त्यांना बरोबर माहिती असे. ‘बाळा’ चित्रपटातल्या बाळा या मुलाच्या क्रिकेट ध्यासाची ते कशी दखल घेतात आणि त्याच्या गुणांची पारख करत त्याला कशाप्रकारे घडवतात, याची प्रेरणादायी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या भूमिकेबद्दल विचारणा केल्यानंतर ‘मला अभिनय जमणार नाही!’, असं सांगणाऱ्या अजित वाडेकर यांना अभिनेता विक्रम गोखले यांनी ‘तुला अभिनय नाही तर तुझ्या आवडीची प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळायची आहे’, असं सांगितल्यानंतर विक्रमजींच्या विनंतीला मान देत अजित वाडेकर यांनी या चित्रपटाला होकार दिला होता. सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत या कलाकारांसोबत मिहीरीश जोशी हा नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:यशस्वी कर्णधार, दर्जेदार प्रशिक्षक आणि उत्तम संघटक अशी ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांची ख्याती होती. निवृत्तीनंतरही त्यांचे क्रिकेटशी नाते तुटले नाही. चित्रपटाच्या माध्यमातूनही आपले क्रिकेटप्रेम जपत त्यांनी एक विशेष भूमिका ‘बाळा’ या मराठी चित्रपटात साकारली. येत्या ३ मे ला हा चित्रपटातुन त्यांचं अखेरचं दर्शन होणार आहे.

क्रिकेटवर आधारलेल्या ‘बाळा’ चित्रपटात क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत ते आपल्याला दिसणार आहेत. युवा खेळाडूंच्या गुणवत्तेची अचूक पारख त्यांना होती. कोणामध्ये किती क्षमता आहे ? हे त्यांना बरोबर माहित असे. ‘बाळा’ चित्रपटातल्या बाळा या मुलाच्या क्रिकेट ध्यासाची ते कशी दखल घेतात आणि त्याच्या गुणांची पारख करत त्याला कशाप्रकारे घडवतात याची प्रेरणादायी कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

या भूमिकेबद्दल विचारणा केल्यानंतर ‘मला अभिनय जमणार नाही!’, असं सांगणाऱ्या अजित वाडेकर यांना अभिनेता विक्रम गोखले यांनी ‘तुला अभिनय नाही तर तुझ्या आवडीची प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळायची आहे’, असं सांगितल्यानंतर विक्रमजींच्या विनंतीला मान देत अजित वाडेकर यांनी या चित्रपटाला होकार दिला होता.

‘यश अँड राज एंटरटेंन्मेट’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती, निर्माते राकेश सिंग यांनी केली असून सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत या मातब्बर कलाकारांसोबत मिहीरीश जोशी हा नवा चेहरा तसेच यशवर्धन–राजवर्धन, आशिष गोखले, ज्योती तायडे अपेक्षा देशमुख, हिया सिंग हे सहकलाकार या सिनेमात दिसणार आहेत.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.