मुंबई - फुटबॉल खेळाचा रंजक सुवर्णकाळ उलगडणारा 'मैदान' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अजय देवगन यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. आता नवं पोस्टर प्रदर्शित करुन चित्रपटाच्या नव्या तारखेबाबत माहिती देण्यात आली आहे.
-
#AjayDevgn's #Maidaan gets a NEW release date: 11 Dec 2020... Will release in #Hindi, #Tamil, #Telugu and #Malayalam... Directed by Amit Ravindernath Sharma... Produced by Zee Studios, Boney Kapoor, Arunava Joy Sengupta and Akash Chawla. pic.twitter.com/sxWDN8NKYL
— taran adarsh (@taran_adarsh) February 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#AjayDevgn's #Maidaan gets a NEW release date: 11 Dec 2020... Will release in #Hindi, #Tamil, #Telugu and #Malayalam... Directed by Amit Ravindernath Sharma... Produced by Zee Studios, Boney Kapoor, Arunava Joy Sengupta and Akash Chawla. pic.twitter.com/sxWDN8NKYL
— taran adarsh (@taran_adarsh) February 3, 2020#AjayDevgn's #Maidaan gets a NEW release date: 11 Dec 2020... Will release in #Hindi, #Tamil, #Telugu and #Malayalam... Directed by Amit Ravindernath Sharma... Produced by Zee Studios, Boney Kapoor, Arunava Joy Sengupta and Akash Chawla. pic.twitter.com/sxWDN8NKYL
— taran adarsh (@taran_adarsh) February 3, 2020
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. हा चित्रपट आता ११ डिसेंबर २०२० ला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजय देवगन फुटबॉल परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'मैदान' चित्रपटाच्या निमित्ताने अजय देवगन पहिल्यांदाच 'बधाई हो' चित्रपटाचे दिग्दर्शक अमित रविंद्रनाथ शर्मा यांच्यासोबत काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामनी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, गजराज राव यांचीही यामध्ये भूमिका पाहायला मिळणार आहे.
१९५२ ते १९६२ हा भारतीय फुटबॉलचा सुवर्ण काळ मानला जातो. या चित्रपटातून याच काळातील फुटबॉल स्पर्धेचा थरार पडद्यावर पाहायला मिळेल. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सैविन कुद्रास आणि रितेश शाह यांचे आहे. झी स्टुडिओ आणि बोनी कपूर, अकाश चावला आणि अर्णव जॉय सेनगुप्ता यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.