मुंबई - अजय देवगनच्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्येही तान्हाजींच्या शौर्यगाथेची झलक पाहायला मिळते. महाराजांच्या स्वराज्यावर शत्रूंचा डोळा असतानाही कशा प्रकारे वीर मावळ्यांनी मोठ्या धीराने आणि साहसाने आपल्या जीवाची बाजी लावली, याची साहसकथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
तान्हाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोंढाणा किल्ल्यासाठी लढाई केली होती. घरात आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असताना कोंढाणा राखण्यासाठी ते सज्ज झाले होते. 'आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं', असं म्हणून त्यांनी या लढाईसाठी आपल्या प्राणाजी बाजी लावली.
-
4th Feb 1670: The battle that brought the entire nation to a standstill.
— Ajay Devgn (@ajaydevgn) December 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Witness the moment history was created. Presenting the official #TanhajiTrailer2: https://t.co/wT6V4jwX4A#TanhajiTheUnsungWarrior@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @ADFFilms
">4th Feb 1670: The battle that brought the entire nation to a standstill.
— Ajay Devgn (@ajaydevgn) December 16, 2019
Witness the moment history was created. Presenting the official #TanhajiTrailer2: https://t.co/wT6V4jwX4A#TanhajiTheUnsungWarrior@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @ADFFilms4th Feb 1670: The battle that brought the entire nation to a standstill.
— Ajay Devgn (@ajaydevgn) December 16, 2019
Witness the moment history was created. Presenting the official #TanhajiTrailer2: https://t.co/wT6V4jwX4A#TanhajiTheUnsungWarrior@itsKajolD #SaifAliKhan @omraut @itsBhushanKumar @SharadK7 @ADFFilms
हेही वाचा -प्रतीक्षा संपली.. रजनीकांत यांच्या 'दरबार'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
सुभेदार तान्हाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचीही झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
अजय देवगनसोबतच, काजोल, शरद केळकर, सैफ अली खान, देवदत्त नागे आणि इतरही अनेक कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.
दिग्दर्शक ओम राऊतने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -हरिवंशराय बच्चन यांचा पोलंड येथे सन्मान, बिग बींच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम