ETV Bharat / sitara

लोकप्रियतेच्या बाबतीत अजय देवगण नंबर वन, 'या' सुपरस्टारला टाकले मागे - Ajay Devgn news

स्कोर ट्रेंड इंडियाच्या लोकप्रियतेच्या चार्टवरही अजय देवगण नंबर एकवर विराजमान झाला आहे.

Ajay Devgn Got number one in score trends of India
लोकप्रियतेच्या बाबतीत अजय देवगन नंबर वन, 'या' सुपरस्टारला टाकले मागे
author img

By

Published : Jan 28, 2020, 1:58 PM IST

मुंबई - बॉलीवूडमधला ‘मिस्टर डिपेंडेबल’ म्हणून ओळखला जात असलेला अभिनेता अजय देवगणची १०० वी कलाकृती असलेल्या 'तान्हाजी' चित्रपटाने कमाल केली आहे. २०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवली आहे. आता स्कोर ट्रेंड इंडियाच्या लोकप्रियतेच्या चार्टवरही अजय देवगण नंबर एकवर विराजमान झाला आहे.

लोकप्रियतेच्या बाबतीत अजयने सुपरस्टार रजनीकांत यांनाही मागे टाकले आहे. जानेवारी महिन्यात 'तान्हाजी' चित्रपटामुळे अजय देवगणच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झालेली दिसून येतेय. तान्हाजी चित्रपटाच्या प्रमोशनच्यामुळे वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात अजयने लोकप्रियतेत चौथे स्थान मिळवले होते. पण, चित्रपट सिनेमागृहांमध्ये झळकताच अजय देवगणच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. त्यामुळे अजय पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

Ajay Devgn Got number one in score trends of India
रजनीकांत यांना पिछाडत अजय देवगन नंबर वन

'तान्हाजी' चित्रपटाच्या रिलीजवेळीच सुपरस्टार रजनीकांतचा 'दरबार' चित्रपटही झळकला. या सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे रजनीकांत यांच्याही लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून येतेय. साऊथ सुपरस्टार रजनीकांत आपल्या सिनेमाच्या रिलीजवेळी सातव्या स्थावार होते. तर चित्रपट रिलीज झाल्यावर ते सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचले आहेत.

सुपरस्टार रजनीकांत यांना लोकप्रियतेत बॉलीवूडच्या ३ महारथींनी चांगलीच टक्कर दिली आहे. सलमान खान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या बॉलीवूडच्या तीन सुपरस्टार्सनी लोकप्रियतेत रजनीकांत यांना मागे टाकले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

या आकडेवारीनूसार, डिजिटल न्यूज (सोशल प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट), व्हायरल न्यूज आणि न्यूजप्रिंटवर अजय देवगन ९५.९८ गुणांसह प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. तर सलमान खान ७५.२४ गुण पटकावून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. 'बिग बॉस' हा कार्यक्रम त्यामध्ये होणाऱ्या वाद विवादांमूळे चर्चेत असतो.

भारतीय सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चन ४९.५३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. तर ब्लॉकबस्टर 'कुमार' म्हणून ओळखला जाणारा अक्षयकुमार आपल्या 'गुड न्यूज' सिनेमाच्या यशामुळे बॉक्स ऑफिससोबतच लोकप्रियतेतही पुढे आहे. ३१.९८ गुणांसह अक्षय चौथ्या पदावर आहे. लिव्हिंग लिजेंड रजनीकांत २६.१७ गुणांसह लोकप्रियतेत पाचव्या स्थानावर आहेत.

लोकप्रियतेच्या बाबतीत अजय देवगन नंबर वन

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “डिजिटल प्लॅटफॉर्म आणि न्यूज पोर्टल्सवर अजय देवगणची लोकप्रियता वाढलेली दिसून आलीये. तान्हाजीच्या लोकप्रियतेने बॉक्स ऑफिसवर तर कमाल केलीच. पण त्यासोबतच सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटगहांमध्ये केलेल्या शिवरायांचा आणि तान्हाजीच्या जयजयकाराची क्लिपही खूप व्हायरल झाली'.

अश्वनी कौल पुढे सांगतात , 'आम्ही मीडिया विश्लेषणासाठी १४ भाषांमध्ये ६०० पेक्षा जास्त बातम्यांमधून डेटा संग्रहित करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, सोशल मीडिया, व्हायरल न्यूज, प्रकाशने आणि डिजिटल प्लेटफॉर्म समाविष्ट आहेत. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो'.

Intro:बॉलीवूडमधला ‘मिस्टर डिपेंडेबल’ म्हणून ओळखला जात असलेल्या अभिनेता अजय देवगनची 100 वी कलाकृती असलेल्या तान्हाजी चित्रपटाने कमाल केली आहे. 200 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचलेल्या ह्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवतच असताना स्कोर ट्रेंड इंडियाच्या लोकप्रियतेच्या चार्टवरही अजय देवगन नंबर वन स्थानी विराजमान झालेला आहे.

जानेवारी महिन्यात तान्हाजी चित्रपटामूळे अजय देवनगच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झालेली दिसून येतेय. तान्हाजी चित्रपटाच्या प्रमोशनच्यामूळे वर्षाच्या सुरूवातीच्या महिन्यात अजयने लोकप्रियतेत चौथे स्थान मिळवले होते. पण चित्रपट सिनेमागृहांमध्ये झळकताच अजय देवगनच्या लोकप्रियतेत वाढ झाली आणि अजय पहिल्या स्थानी पोहोचला.

तान्हाजीच्या रिलीजवेळीच सुपरस्टार रजनीकांतचा दरबार चित्रपटही झळकला. ह्या सिनेमाच्या लोकप्रियतेमूळे रजनीकांतच्याही लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून येतेय. साउथ सुपरस्टार रजनीकांत आपल्या सिनेमाच्या रिलीजवेळी सातव्या स्थावार होते. तर चित्रपट रिलीज झाल्यावर ते सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचले.

सुपरस्टार रजनीकांत ह्यांना लोकप्रियतेत बॉलीवूडच्या तीन महारथींनी चांगलीच टक्कर दिली आहे. सलमान खान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ह्या बॉलीवूडच्या तीन सुपरस्टार्सनी लोकप्रियतेत रजनीकांत ह्यांना मागे टाकले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

ह्या आकडेवारीनूसार, डिजिटल न्यूज (सोशल प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट), व्हायरल न्यूज आणि न्यूजप्रिंटवर अजय देवगन 95.98 गुणांसह प्रथम क्रमांकावर पोहोचलाय. तर 75. 24 ह्या आंकडेवारीनूसार, बिग बॉसचा होस्ट सुपरस्टार सलमान खान दूस-या स्थानावर आहे. बिग बॉस 13 हा शो सध्या त्यात होणा-या अनेक वाद-विवादांमूळे खूप चर्चेत आहे.

भारतीय सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चन 49.53 गुणांसह तिस-या स्थानावर आहेत. तर ब्लॉकबस्टर 'कुमार' म्हणून ओळखला जाणारा अक्षयकुमार आपल्या गुड न्यूज सिनेमाच्या सक्सेसमूळे बॉक्स ऑफिससोबतच लोकप्रियतेतही पूढे आहे. 31.98 गुणांसह अक्षय चौथ्या पदावर आहे. लिव्हिंग लिजेंड रजनीकांत 26.17 गुणांसह लोकप्रियतेत पांचव्या स्थानावर आहेत.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “डिजिटल प्लॅटफॉर्म आणि न्यूज पोर्टल्सवर अजय देवगनची लोकप्रियता वाढलेली दिसून आलीय. तान्हाजीच्या लोकप्रियतेने बॉक्स ऑफिस तर कमाल केलीच. पण त्यासोबतच सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटगहांमध्ये केलेल्या शिवरायांचा आणि तान्हाजीच्या जयजयकाराची क्लिपही खूप व्हायरल झाली. ह्या व्हिडियो क्लिपमूळेही तान्हाजीची लोकप्रियता दुप्पट झाली. ज्यामूळे अजय देवगनच्या लोकप्रियतेत वाढ झालेली आहे.“

अश्वनी कौल पूढे सांगतात , "आम्ही मीडिया विश्लेषणासाठी 14 भाषांमध्ये 600 पेक्षा जास्त बातम्यांमधून डेटा संग्रहित करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, प्रिंट प्रकाशन, सोशल मीडिया, व्हायरल न्यूज, प्रकाशने आणि डिजिटल प्लेटफॉर्म समाविष्ट आहेत. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.