मुंबई - दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अजय देवगन एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, सध्या या चित्रपटाच्या कथानकावर काम करणे सुरू आहे. त्यामुळे अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही, असे लव रंजन यांनी स्पष्ट केले आहे.
रणबीर कपूर आणि अजय देवगन यांनी 'राजनीती' या चित्रपटात एकत्र भूमिका साकारली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे दोघांनाही पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यामुळे लव रंजन यांच्या आगामी चित्रपटात दोघेही एकत्र झळकणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. अभिनेत्री दीपिका पदुकोन देखील यामध्ये झळकणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, याबाबतही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
हेही वाचा -मराठमोळी संस्कृती दाखवणारं 'तान्हाजी'चं नवं गाणं प्रदर्शित
'प्यार का पंचनामा' चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत एकत्र येऊन आगामी चित्रपटावर काम करणार असल्याचं लव रंजन यांनी सांगितलं आहे. ज्यावेळी चित्रपटाचे काम पूर्ण होईल तेव्हा याची घोषणा करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.
सध्या त्यांच्या निर्मितीखाली 'जय मम्मी दी' हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सनी सिंग यामध्ये भूमिका साकारत आहे.
हेही वाचा -'लॅक्मे फॅशन विक'साठी दिल्लीतील तरुणींचा उत्साह, सागरीका घाडगेच्या उपस्थितीत पार पडली स्पर्धा