ETV Bharat / sitara

आयुष्मान भारत योजनेच्या यशासाठी अमिताभ-अजयने केले मोदींचे अभिनंदन - आरोग्य विमा योजना

देशाची आरोग्य विमा योजना असलेल्या 'आयुष्मान' भारतने लाभार्थींचा आकडा १ कोटी पार केला आहे. या यशाबद्दल अभिनेता अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

Ajay Devgan, Amutabh
अमिताभ-अजय
author img

By

Published : May 21, 2020, 7:50 PM IST

मुंबई - भारत सरकारच्या आयुष्मान भारत या योजनेने १ कोटी लाभधारकांचा आकडा पार केल्याबद्दल अभिनेता अजय देवगण आणि मेगास्टार अमिताभ बच्चनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

सरकारी आरोग्य विमा योजनेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना अजय देवगणने ट्विटरवर म्हटले आहे, जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आयुष्मान भारतने १ कोटी लाभधारकांचा आकडा पार केला आहे. २ वर्षांत खूप मोठे पाऊल. हा मैलाचा दगड पार केल्याबद्दल मी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. स्वस्थ राष्ट्र ही मजबूत राष्ट्र है...'

अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे, आयुष्मान भारतने हा मैलाचा दगड गाठला आहे. या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन'

आयुष्मान भारत योजना ही देशाची आरोग्य विमा योजना आहे. याचा हेतू दुसऱ्या स्तरावर मोफत आरोग्य संरक्षण देणे आणि तिसऱ्या स्तरावर ४० टक्के गरीब लोकांना सुविधा देणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.