मुंबई - अजय देवगणचा 'तानाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील 'तानाजी' यांच्या भूमिकेसाठी अजय देवगन हाच आपली पहिली आणि शेवटची निवड असल्याचं दिग्दर्शक ओम राऊत यांनी सांगितलं आहे. 'ई टीव्ही भारत'शी त्यांनी संवाद साधला.
१९ नोव्हेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. सिनेमातील काही दृष्यांवर काही संघटनानी आक्षेप घेतला असला तरीही तानाजी मालुसरे यांच शौर्य मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -तान्हाजी सिनेमावर घेतलेल्या आक्षेपावर हे होत अजय देवगण आणि ओम राऊत यांचं स्पष्टीकरण
२०१५ साली हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून गेली ४ वर्षे ओम राऊत आणि त्याच्या टीमने हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली आहे. १६० कोटी बजेटमध्ये हा चित्रपट पूर्ण करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
अजय देवगणसोबत किल्लेदार उदयभानच्या भूमिकेसाठी सैफ अली खान योग्य वाटेल, असे ओमला वाटले. त्यावर सैफनेही फारसे आढे वेढे न घेता सिनेमाला होकार दिला. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तानाजी यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका करायला अभिनेत्री काजोल हिने होकार दिला. त्यामुळे अजय आणि काजोल यांना एवढ्या वर्षांनी एकत्र आणण्याचं भाग्य देखील ओम राऊत यालाच मिळालं.
हेही वाचा -पाहा ट्रेलर : 'हर एक मराठा में छुपा है एक लाख मराठा' : 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर'
चित्रपटाचे व्हिएफएक्स करण्याचे शिवधनुष्य 'बाजीराव मस्तानी' सारख्या सिनेमाचे व्हिएफएक्स करणाऱ्या प्रसाद सुतार आणि त्यांच्या टीमने आपल्या हातात घेऊन ते पूर्ण केलं आहे. ज्याचा परिणाम मोठ्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळतोय.
शरद केळकर, देवदत्त नागे, अजिंक्य देव यांसारखे अनेक मराठी कलाकार सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एकूणच तानाजी प्रत्यक्ष पडद्यावर आणण्यासाठी ओम याने किती कष्ट घेतले हे या चित्रपटातून पाहायला मिळेल.