ETV Bharat / sitara

अहान शेट्टीच्या पदर्पणीय ‘तडप’ची प्रदर्शन-तारीख झाली जाहीर! - तडप चित्रपटातून अहान शेट्टीचे पदार्पण

अभिनेता सुनील शेट्टी यांचा सुपुत्र अहान शेट्टी आता चंदेरी दुनियेत पदार्पण करतोय. बहुप्रतीक्षित चित्रपट 'तड़प - ॲन इनक्रेडिबल लव स्टोरी' हा त्याचा पहिला चित्रपट असेल. याची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. महत्वाचे म्हणजे सुनील शेट्टीला सुद्धा याच निर्मात्यांद्वारा लॉन्च करण्यात आले होते आणि पुन्हा एकदा या योगदानाबद्दल ते सर्वजण उत्साहित आहेत.

‘तडप’ची प्रदर्शन-तारीख झाली जाहीर!
‘तडप’ची प्रदर्शन-तारीख झाली जाहीर!
author img

By

Published : Aug 28, 2021, 10:28 PM IST

अभिनेता सुनील शेट्टी यांचा सुपुत्र आणि अभिनेत्री अथिया शेट्टीचा भाऊ आता चंदेरी दुनियेत पदार्पण करतोय. साजिद नाडियादवाला निर्मित ‘तडप - ॲन इनक्रेडिबल लव स्टोरी‘ यावर्षीच्या शेवटाला प्रदर्शित होणार आहे. नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंटचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'तड़प - ॲन इनक्रेडिबल लव स्टोरी', ज्यामध्ये तारा सुतारियासोबत अहान शेट्टी बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहे. महत्वाचे म्हणजे सुनील शेट्टीला सुद्धा याच निर्मात्यांद्वारा लॉन्च करण्यात आले होते आणि पुन्हा एकदा या योगदानाबद्दल ते सर्वजण उत्साहित आहेत. साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत अहान शेट्टीचे हे बॉलीवूड पदार्पण एका वारशाला पुढे घेऊन जाणारे आहे.

अहानसोबत तारा सुतारिया आहे, जिने दोन वर्षांपूर्वी करण जोहर निर्मित ‘स्टुडन्ट ऑफ द ईयर २’ मधून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. छोट्याशा अवधीत तिने आपल्या समकालीनांमध्ये आपली जागा बनवली आहे. अहान शेट्टी आणि तारा सुतारिया एका नव्या फ्रेश जोडीसोबत सर्वात रोमांचक पद्धतीने समोर येणारी प्रेम कहाणी, प्रेक्षकांसाठी निश्चितपणे एक छानशी दृश्य-मेजवानी असेल. 'तड़प' मधील अहानच्या फर्स्ट लुकने प्रेक्षकांमध्ये उत्साहाची एक मोठी लाट निर्माण केली आहे आणि एक नवा चेहरा पाहण्यासाठी सगळे उत्साहित आहेत.

‘तडप’ची प्रदर्शन-तारीख झाली जाहीर!
‘तडप’ची प्रदर्शन-तारीख झाली जाहीर!

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करताना, नाडियाडवाला ग्रैंडसनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले, “POST TO BE ADDED.”

'तड़प' मिलन लूथरिया दिग्दर्शित चित्रपट असून अहान शेट्टी, तारा सुतारिया, सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा आणि सुमित गुलाटी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे निर्माते आहेत साजिद नाडियाडवाला आणि फॉक्स स्टार स्टूडियोद्वारा तो सह-निर्मित आहे. चित्रपटाची कथा रजत अरोरा यांनी लिहिली असून प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे.

‘तडप’ची प्रदर्शन-तारीख झाली जाहीर!
‘तडप’ची प्रदर्शन-तारीख झाली जाहीर!

अहान शेट्टी आणि तारा सुतारिया अभिनीत साजिद नाडियाडवाला यांचा 'तड़प - ॲन इनक्रेडिबल लव स्टोरी', ३ डिसेंबर, २०२१ ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - ''माधुरीच..!!'' मिथीला पालकरचा हा सुंदर नवा लुक तुम्ही बघितलाय का...?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.