मुंबई - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि मौनी रॉय एकत्र झळकणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. त्यांच्या आगामी 'बोले चुडीयां' चित्रपटात दोघेही एकत्र भूमिका साकारणार होते. दोघांचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते. मात्र, अचानक मौनी रायला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यामुळे या चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागते, याची चाहत्यांना उत्सुकता होती.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात आता श्रद्धा कपूर किंवा सोनाक्षी सिन्हा यांची वर्णी लागू शकते. या चित्रपटासाठी त्यांची नावे समोर येत आहेत. 'बोले चुडियां'चे दिग्दर्शक शमास सिद्दिकी यांनी सांगितलेय, की नवाजुद्दीनसोबत या दोघींपैकी एका अभिनेत्रीची वर्णी लागू शकते. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हा चित्रपट ऑक्टोंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नवाजुद्दीन लवकरच 'सेक्रेड गेम्स २' मध्येही झळकणार आहे. नेटफ्लिक्सवर त्याचा नवा प्रोमोदेखील प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे नवाजुद्दीनला पुन्हा एकदा गणेश गायतोंडेची भूमिका साकारताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.