मुंबई - दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कबिर सिंग'ने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. कबिर सिंग हा त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या 'अर्जुन रेड्डी' चित्रपटाचा रिमेक होता. या दोन्हीही चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. 'अर्जुन रेड्डी'मध्ये विजय देवरकोंडाने मुख्य भूमिका साकारली होती. तर, 'कबिर सिंग'मध्ये शाहिद कपूर आणि कियारा आडवाणीची जोडी झळकली होती. आता या चित्रपटानंतर संदीप रेड्डी वांगा हे गुन्हेगारीवर आधारित चित्रपट तयार करणार आहेत.
होय, 'कबिर सिंग'च्या लव्हस्टोरीनंतर आता क्राईम ड्रामा तयार करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांच्यासोबत ते हा चित्रपट तयार करतील. या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलं नाही. मात्र, चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
-
BIGGG NEWS... #ArjunReddy and #KabirSingh director Sandeep Reddy Vanga's next film is a crime drama... Not titled yet... Bhushan Kumar and Murad Khetani - who produced the Blockbuster #KabirSingh - will produce this film with Vanga... Cast will be announced soon. pic.twitter.com/p00YqXYIpI
— taran adarsh (@taran_adarsh) October 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BIGGG NEWS... #ArjunReddy and #KabirSingh director Sandeep Reddy Vanga's next film is a crime drama... Not titled yet... Bhushan Kumar and Murad Khetani - who produced the Blockbuster #KabirSingh - will produce this film with Vanga... Cast will be announced soon. pic.twitter.com/p00YqXYIpI
— taran adarsh (@taran_adarsh) October 10, 2019BIGGG NEWS... #ArjunReddy and #KabirSingh director Sandeep Reddy Vanga's next film is a crime drama... Not titled yet... Bhushan Kumar and Murad Khetani - who produced the Blockbuster #KabirSingh - will produce this film with Vanga... Cast will be announced soon. pic.twitter.com/p00YqXYIpI
— taran adarsh (@taran_adarsh) October 10, 2019
हेही वाचा -ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तब्बल ४ वर्षांनी 'डॅडी' दगडी चाळीत परतले
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही या चित्रपटाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा -बिहारच्या पूरग्रस्तांना अमिताभ यांनी केली ५१ लाखाची मदत