ETV Bharat / sitara

पहिल्यांदाच अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आदित्य रॉय कपूर - fitoor

आदित्यने चित्रपटाच्या अॅक्शनसाठी तयारीदेखील सुरू केली आहे. वजन वाढवण्यासाठी तो जिममध्ये मेहनत घेत आहे. आहारावरही तो लक्ष देत आहे. या चित्रपटात त्याचे दोन वेगवेगळे लूक्स पाहायला मिळणार आहेत.

पहिल्यांदाच अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आदित्य रॉय कपूर
author img

By

Published : May 5, 2019, 3:56 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये रोमॅन्टिक हिरो, अशी ओळख असलेला आदित्य रॉय कपूर लवकरच एका अॅक्शन चित्रपटात झळकणार आहे. मोहित सूरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या 'मलंग' चित्रपटात तो अॅक्शन हिरो म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी तो तब्बल १० किलो वजन वाढवणार आहे.

लव्ह फिल्म्स आणि टी-सीरिजचे प्रॉडक्शन असलेला 'मलंग' चित्रपट एक रोमॅन्टिक हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूरसोबत दिशा पटाणी, अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे कलाकारही झळकणार आहेत. या चित्रपटाबाबत आदित्यने सांगितले, की 'मलंग एक डार्क थ्रिलर प्रेमकथा आहे. यासाठी मी फार उत्साही आहे. पहिल्यांदाच अॅक्शन हिरोची भूमिका साकरत असल्यामुळे नव्या भूमिकेत मला पाहता येईल'.

Malang
मलंग टीम

आदित्यने चित्रपटाच्या अॅक्शनसाठी तयारी देखील सुरू केली आहे. वजन वाढवण्यासाठी तो जिममध्ये मेहनत घेत आहे. आहारावरही तो लक्ष देत आहे. या चित्रपटात त्याचे दोन वेगवेगळे लूक्स पाहायला मिळणार आहेत.

Malang
मलंग टीम

आदित्य अलिकडेच 'कलंक' चित्रपटात दिसला. 'कलंक' चित्रपटाकडून चाहत्यांना फार अपेक्षा होत्या. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, वरूण धवन, आलिया भट्ट आणि माधुरी दिक्षीत अशी तगडी स्टारकास्ट झळकली होती. मात्र, या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली.
'मलंग' चित्रपटानंतर तो आलिया भट्ट सोबत 'सडक-२'मध्ये देखील भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिकेत असेल.

Intro:Body:

Ent 06

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.