अवघ्या महाराष्ट्राला अप्सरा बनून आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या फॅन्सना एक गोड बातमी दिली आहे. कुणाल बेनोडेकर या व्यवसायिकाशी 2 फेब्रुवारी रोजी आपला साखरपुडा पार पडला असून लवकरच आपण त्याच्याशी लग्न करणार असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं आहे.
बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीतील आलेली पाहता पाहता उभ्या महाराष्ट्राची लाडकी अप्सरा बनली. एवढ्यावरच न थांबता तिने हिरकणी बनून गतवर्षी प्रेक्षकांची मन जिकली. यावर्षी आपल्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकी जपत तिने फॅन्सकडून मिळणाऱ्या गिफ्टरूपी रक्कमेत तेवढीच रक्कम स्वतः कडून टाकून एका रुग्णालयाला पीपीई किट्स दिले. तिच्या या कृतीच कौतुक होत ना होत तोच दिवसाखेर तिने आपल्या फॅन्सना हा सुखद धक्का दिला.
कुणाल बेनोडेकर हा एक बिजनेसमन आहे. त्याची आणि सोनालीची भेट झाल्यानंतर काही दिवसात त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2 फेब्रुवारी 2020 रोजी मोजक्या पाहुण्याच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर येत्या काही दिवसात लॉकडाऊन हटल्यावर त्यांचा लग्नाची तारीखदेखील जाहीर होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर सोनालीने ही बातमी जाहीर करताच तिच्या फॅन्सनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. आता वाट पहायची ती सोनालीची लग्न घटिका कधी समीप येते त्याची..