ETV Bharat / sitara

अभिनेत्री प्रार्थना बेहरेची श्रमिक महिलांना आगळी-वेगळी मानवंदना! - Salute to the social contribution of working women

या आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रार्थना बेहरेने आपला मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडला. तिने श्रमिक महिलांच्या सामाजिक योगदानाला सलाम करताना आगळं वेगळं फोटो शूट करून त्यांच्या कार्याला मानवंदना दिली. तिच्या या उपक्रमाला समाज माध्यमांवर खूप प्रतिसाद मिळाला आहे.

prarthana-behere
अभिनेत्री प्रार्थना बेहरे
author img

By

Published : Mar 9, 2021, 7:59 PM IST

दरवर्षी ८ मार्च ला साजरा होणार आंतरराष्ट्रीय महिला दिन समाजातील सर्वच स्तरावर सेलिब्रेट केला जातो. यावर्षी अनेक महिलांचे, ज्यात मनोरंजनसृष्टीतीलही अनेक महिला आहेत, मत पडले की फक्त एकाच दिवशी महिला दिवस का साजरा करायचा? तो तर वर्षाच्या प्रत्येक दिवशी साजरा व्हायला हवा. खरंतर जगभरातील पुरुषप्रधान समाजाने महिलांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी या दिवसाची निवड केली. असो. मराठी मनोरंजनसृष्टीत भक्कम स्थान असलेली मराठमोळी नायिका प्रार्थना बेहरे सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असते. तिच्या मते सर्व थरातील स्त्रियांचा सन्मान होणं गरजेचं आहे कारण समाजातील प्रत्येक स्त्री इम्पॉर्टन्ट आहे.

या आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रार्थनाने आपला मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडला. तिने श्रमिक महिलांच्या सामाजिक योगदानाला सलाम करताना आगळं वेगळं फोटो शूट करून त्यांच्या कार्याला मानवंदना दिली. तिच्या या उपक्रमाला समाज माध्यमांवर खूप प्रतिसाद मिळाला आहे. तिने लिहिले, जागतिक महिलादिनी आम्हांला त्या कणखर आणि खंबीर महिलांना सलाम करावासा वाटतो ज्या आपल्या कष्टाने रोज घाम गाळून छोट्या प्रमाणावर का होईना देशाच्या आर्थिक उन्नतीतमध्ये भर घालतात आणि नेटाने आपले घर आणि देश चालवतात आशा सर्व कष्टकरी रणरागिनी महिलांना माझा सलाम 🙏🏻

#महिलादिवस

ज्योती अडागळे सोनं पिकवाया लावते जोर,काळ्या आईची खंबीर पोर! संसार उभा करत देशाच्या अर्थव्यस्थेला उभी करणारी नारी.

#महिलादिवस
सुषमा माळी
जसं लग्न झालं, तसं ती नवऱ्यासोबत मासेविक्री करते. संसार उभा करत देशाच्या अर्थव्यस्थेला उभी करणारी नारी.

#महिलादिवस
रत्ना वाघमारे
काळया आईची सेवा, हाच तिच्या जिंदगीचा अनमोल ठेवा.
संसार उभा करत देशाच्या अर्थव्यस्थेला उभी करणारी नारी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.