ETV Bharat / sitara

विक्रम गोखलेंची चित्रपट महामंडळाला मोठी मदत; तब्बल अडीच कोटींची जमीन केली दान..

महामंडळाने ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंताना आसरा आणि सहारा मिळावा म्हणून ज्येष्ठ कलावंतासाठी मोफत राहण्याची सोय करण्यासाठी सदर जागा विक्रम गोखले यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान करण्याची घोषणा केली आहे.

कठीण काळात अभिनेते विक्रम गोखले यांनी चित्रपट महामंडळाला दिली देणगी

author img

By

Published : May 27, 2020, 8:38 PM IST

Updated : May 27, 2020, 11:18 PM IST

मुंबई - काही कलावंत आपल्या घराचा वारसा घेऊनच आलेले आहेत, मग तो अभिनयातील असो वा दानधर्माचा. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले हे विक्रमजींचे वडील. जे दरवर्षी देशाप्रती आपली कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आपल्या कमाईतील काही भाग नित्यनेमाने भारतीय सैन्यदलाला मदत म्हणून देत असत. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव विक्रम गोखले यांनी त्यांचा हा स्तुत्य वारसा पुढे चालू ठेवला असून दरवर्षी त्यांनीही हे मदतकार्य चालूच ठेवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कलाकार काही ना काही मदत करीत आहेत. विक्रमजींनी स्वतः मदत तर केली आहेच, परंतु बॉलिवूडमधील इतर कलावंतांनाही हक्काने मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या सहकलाकारांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

विक्रमजींनी ज्येष्ठ कलावंतांची नेहमी होणारी फरफट पाहिली आहे. त्यासाठी काहीतरी उपाय शोधावा, अशी त्यांची कायमच भावना होती. आपली ही मनीषा पूर्ण करण्यासाठी त्यांनी यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पाठिंबा देत ही जबाबदारी पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीच्या जमीनीपैकी एक एकर चित्रपट महामंडळाला, तर एक एकर सिंटाला दान केली आहे. आज बाजारभावानुसार याची एकूण किंमत ही २.५ कोटी रुपयांपेक्षा कमी नाही. या ठिकाणी महामंडळाने ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंताना आसरा आणि सहारा मिळावा म्हणून ज्येष्ठ कलावंतासाठी मोफत राहण्याची सोय करण्यासाठी सदर जागा विक्रम गोखले यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान करून महामंडळाच्या नावाने करून देण्याची घोषणा केली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपटाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आश्रम उभा करण्याचे ठरवले असून त्यांनी विक्रम गोखले यांचे आभार मानले आहेत.

खरे तर हे वृद्धाश्रम स्वतः उभारण्याचे स्वप्न विक्रम गोखले यांनी प्रदीर्घ काळ स्वतःच्या ऊराशी बाळगलं होतं. मात्र, गेली काही वर्षे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी नाटकात काम करणं संपूर्णपणे थांबवलं. यामागे घशाचा त्रास हे कारण तर होतच. पण, त्याशिवाय प्रवास करणं त्रासदायक होणं हे देखील कारण होतं. त्यामुळेच अखेर हे स्वप्न स्वप्नच राहू नये यासाठी त्यांनी चित्रपट महामंडळाला ते पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

Last Updated : May 27, 2020, 11:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.