हैदराबाद - साऊथचा अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांचा घटस्फोट झाला ( Dhanush Aishwaryaa Rajinikanth Separated ) आहे. सोशल मीडियात पोस्ट करुन धनुषने ही माहिती दिली आहे. 18 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर त्या दोघांनी एकमेकांच्या संमतीने एकमेकांना घटस्फोट दिला आहे. ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ( Aishwaryaa Actor Rajiniknath Daughter ) आहे.
धनुष आणि ऐश्वर्याने ट्वीट करत ( Dhanush And Aishwaryaa Tweet Separation ) म्हटलं की, "१८ वर्षांचा मित्रत्वाचा सहवास, नवरा बायको आणि पालक असणारे आम्ही नेहमीच एकमेकांचे वेल-विशर्स होतो. आमच्या सहजीवनाच्या प्रवासात आम्ही एकत्र मोठे झालो, एकमेकांना समजून घेत आणि एकमेकांना सांभाळून घेत. या प्रवासात आता आम्ही अशा वळणावर पोहोचलो आहोत की आम्ही दोघे आता निरनिराळ्या मार्गांवरून प्रवास करणार आहोत. ऐश्वर्या आणि मी यांनी वेगळे होण्याचे ठरविले असून आमच्यातील स्वत्व शोधण्याला प्राधान्य देऊ. कृपा आमच्या भावनांचा आदर करा आणि आमच्या गोपनीयतेचा भंग होईल असे काही करू नका. प्रेमाचा प्रसार करा.”
-
🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022
18 वर्षानी झाले विभक्त
काढण कोंडाईन या चित्रपटाच्या सेटवर धनुष आणि ऐश्वर्याची भेट झाली होती. सहा महिने डेट केल्यानंतर 18 नोव्हेंबर २००४ रोजी ते विवाहबद्ध होते. १८ वर्षे एकत्र घालवल्यावर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय ( Dhanush Aishwaryaa Rajinikanth Separated ) घेतला आहे.