मुंबई- बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच 'बॉब विश्वास' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१८ साली 'मनमर्जिया' चित्रपटानंतर तो बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. कोलकाता येथे या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. दरम्यान अभिषेक बच्चनचा सेटवरील एक स्पॉटेड व्हिडिओ समोर आला आहे.
'बॉब विश्वास' या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज अंतर्गत केली जात आहे. अभिषेकने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील त्याची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली होती.
हेही वाचा -अभिषेकच्या वाढदिवसानिमित्य ऐश्वर्याने शेअर केला फॅमिली फोटो
'बॉब विश्वास'चे दिग्दर्शन नवोदित दीया घोष करणार आहे. तर, चित्रपटाची कथा सुजॉय घोष यानी लिहिली आहे.
या चित्रपटानंतर 'बिग बुल' या चित्रपटातही मुख्य भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा -Exclusive : सारा-कार्तिकने उलगडला 'लव्ह आज कल'चा प्रवास, पाहा मुलाखत