मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खान सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. कॅमेरा आणि लोकांपासून दूर राहणारी इरा सोशल मीडियावर मात्र सक्रिय असते. नवनवे फोटो शेअर करुन फॉलोअर्सना खूश करीत असते. आता तिने आपल्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर करीत सर्वांनाच चकित केले आहे.
![Ira Khan revile the secret of dating](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3547500_ira.jpg)
इन्स्टाग्रामवर तिने 'आस्क मी अ क्वेश्चन' या फिचरचा उपयोग करीत जिज्ञासू चाहत्यांना खूश करण्याचा प्रयत्न केलाय. इरा खानला एका चाहत्याने प्रश्न विचारला की तू कोणासोबत डेटिंग करीत आहेस ? याचे उत्तर तिने बिनधास्तपणे दिले आहे. तिने मिशाल कृपलानीसोबतचा आपला फोटो शेअर केला आणि मिशालला टॅगही केला.
![Ira Khan revile the secret of dating](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3547500_ira1.jpg)
मिशाल आणि इरा डेट करीत असल्याची चर्चा आहे. दोघांचे अनेक फोटो इराने शेअर केले आहेत. दोघांचे फोटो पाहता त्यांच्यातील मैत्री वाढत असल्याचे दिसते.