ETV Bharat / sitara

Bhagat Singh Birth Anniversary: भगत सिंग यांच्या जीवनावर तयार झाले हे ७ चित्रपट - Bollywood Movies Inspired by bhagat singh

स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारक भगत सिंग यांची आज ११२ वी जयंती आहे. २८ सप्टेंबर १९०७ साली त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ब्रिटिशांविरोधातील दिलेला लढा अजरामर ठरला.

7 Bollywood Movies Inspired by bhagat singh
भगत सिंग यांच्या जीवनावर तयार झाले हे ७ चित्रपट
author img

By

Published : Sep 28, 2019, 1:32 PM IST

Updated : Sep 28, 2020, 12:56 PM IST

मुंबई - स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारक भगत सिंग यांची आज ११२ वी जयंती आहे. २८ सप्टेंबर १९०७ साली त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ब्रिटिशांविरोधातील दिलेला लढा अजरामर ठरला. त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडी चित्रपटातूनही पडद्यावर मांडण्यात आल्या. त्यांच्या जीवनावर आत्तापर्यंत ७ चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. या सातही चित्रपट भगत सिंग यांनी देशासाठी दिलेलं अमुल्य योगदान पाहायला मिळतं.

शहीद - ए - आझाद भगत सिंग (१९५४)
भगत सिंग यांच्या जीवनावर तयार झालेला हा पहिला चित्रपट होता. जगदीश गौतमा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये प्रेम अबिद, जयराज, स्मृती विश्वास आणि अशिता मुजुमदार यांनी भूमिका साकारल्या होत्या. भगत सिंग यांच्या मृत्यूनंतर २३ वर्षांनी हा चित्रपट तयार झाला होता. यामधील 'सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है', हे गाणं तुफान हिट झालं होतं. मोहम्मद रफींनी हे गाणं गायलं होतं. आजही प्रत्येक राष्ट्रीय दिवसाच्या पर्वावर हे गाणं ऐकायला मिळतं.

शहीद भगत सिंग (१९६३)
साधारणत: एका दशकानंतर हा चित्रपट तयार करण्यात आला होता. यामध्ये शम्मी कपूर यांनी भगत सिंग यांची भूमिका साकारली होती. शकिला, प्रेमनाथ आणि अचला सचदेव यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका पाहायला मिळाल्या. के. एन. बंसल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

शहीद (१८६५)
'शहीद भगत सिंग' या चित्रपटानंतर अवघ्या दोनच वर्षामध्ये पुन्हा एकदा भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित 'शहीद' चित्रपट प्रदर्शित झाला. अभिनेते मनोज कुमार यांनी यामध्ये भगत सिंग यांची भूमिका साकारली होती. यामध्ये प्रेम चोप्रा, अनंत पुरुषोत्तम, प्राण, निरूपा रॉय यांच्यासह इतरही कलाकार झळकले होते. भारतीय सिनेसृष्टीतील एक उत्कृष्ट क्लासिक सिनेमा म्हणून आजही हा चित्रपट ओळखला जात आहे.

या चित्रपटाला १३ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटातील 'ये वतन ये वतन', 'सरफरोशी की तमन्ना', 'ओ मेरा रंग दे बसंती चोला' आणि 'पंगडी संभाल जट्टा', ही गाणी हिट झाली होती. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी ही गाणी गायली होती.
या चित्रपटानंतर ३८ वर्षांनी २००२ मध्ये भगत सिंग यांच्या जीवनावर एकापाठोपाठ एक अशा ३ चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती.

शहीद ए - आझम (२००२)
सोनू सुदने या चित्रपटात भूमिका साकारली होती. सुकुमार नायर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

२३ मार्च १९३१ : शहीद (२००२)
या चित्रपटाचं दिग्दर्शन गुड्डु धन्नाव यांनी केलं होतं. या चित्रपटात भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा लढा दाखवण्यात आला होता. बॉबी देओलने यामध्ये भगत सिंग यांची भूमिका साकारली होती. सनी देओलने चंद्रशेखर आझाद यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमृता राव, अमृता सिंग, ऐश्वर्या रॉय, राहुल रॉय आणि दिव्या दत्ता यांच्याही भूमिका पाहायला मिळाल्या.

द लिजेंड ऑफ भगत सिंग (२००२)
राजकुमार संतोषी यांचं दिग्दर्शन असलेला 'द लिजेंड ऑफ भगत सिंग' हा चित्रपटही २००२ सालीच प्रदर्शित झाला होता. यामध्ये अजय देवगनने भगत सिंग यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला देखील २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

'रंग दे बसंती' (२००६)
राकेश ओमप्रकाश मेहरा यांचं दिग्दर्शन असलेल्या 'रंग दे बसंती' या चित्रपटानेही प्रेक्षकांवर दमदार छाप पाडली होती. यामध्ये आमिर खान, सिद्धार्थ नारायण, सोहा अली खान, कुणाल कपूर, आर. माधवन, शरमन जोशी, अतुल कुलकर्णी आणि एलिस पॅटन यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळाल्या.
२००६ साली प्रजासत्ताक दिनी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
तमिळ अभिनेता सिद्धार्थ नारायण याने या चित्रपटात भगत सिंग यांची भूमिका साकारली होती.

Last Updated : Sep 28, 2020, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.