मुंबई - गेल्या दोन दशकांत हिंदी, पंजाबी, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये अविरतपणे काम करणारी अभिनेत्री नेहा धुपिया म्हणाली की ती जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवखी होती तेव्हा एका कास्टिंग डिरेक्टरने तिला हसणं टाळण्याचा सल्ला दिला होता. ती हसताना चांगली दिसत नाही, असे तिचे म्हणणे होते.
नेहाच्या बॉलिवूड कारकिर्दीच्या अगोदर २००२ मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती. त्यापूर्वी नेहाने १९९४ मध्ये 'मिन्नाराम' या मल्याळम चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले होते.
नेहा धूपिया आता २वर्षाच्या मुलीची आई आहे, दोन दशकांहून अधिक काळ चित्रपट आणि करमणूक उद्योगात आहे आणि अलीकडेच 'स्टेप आऊट' नावाच्या शॉर्ट फिल्मची ती निर्माती बनली आहे. तथापि, अगदी सुरुवातीच्या काळात तिला टीकेला सामोरे जावे लागले होते.
अलिकडे एका मुलाखतीत नेहाला तिच्या कारकीर्दीत मिळालेल्या सर्वात वाईट सल्ल्याबद्दल विचारले गेले होते. इंडस्ट्रीतील तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताना ती म्हणाली, ''तेव्हा एक कास्टींग डिरेक्टर होती. ती मला म्हणायची की तू हसू नकोस. हसताना तू खूप वाईट दिसतेस.'' कास्टिंग डिरेक्टरच्या त्या सल्ल्यामुळे नेहा खूप नाराज झाली होती. तेव्हा ती एक किशोरवयीन मुलगी होती.
नेहा धुपियाने अजय देवगणच्या कयामत - सिटी अंडर थ्रेट या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ज्युली, क्या कूल है हम, एक चालीस की लास्ट लोकल, शूटआउट अॅट लोखंडवाला, तुम्हारी सुलु आणि लस्ट स्टोरीज या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हेही वाचा - प्रपोज डे 2021 : बॉलिवूड स्टार्सच्या रिअल-लाइफ प्रपोज स्टोरीज