ETV Bharat / sitara

VIDEO: यशराज फिल्मसचा दावा; म्हणे, फेस अॅप चॅलेंजची सुरूवात आम्हीच केली - shahrukh khan

फेस अॅपचं चॅलेंज स्वीकारत सामान्यच काय तर कलाकारांनीही आपले फेस अॅपमधील फोटो शेअर केले आहेत. अशात आता या ट्रेंडची सुरूवात आपणच केली असल्याचा दावा यशराज फिल्मसने केला आहे.

यशराज फिल्मस म्हणे, फेस अॅप चॅलेंजची सुरूवात आम्हीच केली
author img

By

Published : Jul 19, 2019, 8:15 PM IST

मुंबई - सध्याच्या काळात एखादं चॅलेंज अवघ्या काही तासातच सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतं. अशाच एका चॅलेंजची गेल्या काही दिवसांपासून तरूणाईमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहेत. अद्याप आम्ही कशाबद्दल बोलतोय याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. सध्या सोशल मीडियावर तरूणांचे वृद्ध अवतारातील फोटोज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

फेस अॅपचं चॅलेंज स्वीकारत सामान्यच काय तर कलाकारांनीही आपले फेस अॅपमधील फोटो शेअर केले आहेत. अशात आता या ट्रेंडची सुरूवात आपणच केली असल्याचा दावा यशराज फिल्मसने केला आहे. होय, यशराज फिल्मसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून गंमत म्हणून वीर झारा चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या चित्रपटातील एका गाण्यात जेव्हा वृद्ध झाल्यानंतर शाहरुख व प्रिती एकमेकांना भेटतात तेव्हा तरूणपणातील आठवणीत रमलेल्या या दोघांचा तरूण आणि वृद्धपणातील असे दोन्ही लूक गाण्यात पाहायला मिळतात. हाच व्हिडिओ शेअर करत आम्ही सर्वात आधी याची सुरूवात केली, असं कॅप्शन यश राज फिल्मलसने दिलं आहे. ज्यानंतर या ट्विटवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.